Partha Chatterjee and Arpita Mukherjee (Pic Credit: PTI)

पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) च्या निकटवर्तीयांपैकी एक अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) च्या घरी ईडीला पैशांचं घबाड मिळाल्याच्या वृत्तानंतर देशभर त्याची चर्चा झाली होती सध्या ईडी कोठडीमध्ये असलेल्या अर्पिताने आपल्याला इतकी रक्कम घरात असल्याचं ठाऊकच नसल्याचा आश्चर्यकारक दावा केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार अर्पिताने धाडसत्रात सापडलेल्या पैशांशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे. कोलकाता मधील Tollygunge आणि Belgharia या अर्पिताच्या फ्लॅट्स मध्ये धाड टाकून ईडीने 49.8 कोटी रक्कम ताब्यात घेतली आहे. अर्पिताच्या दाव्यानुसार ही रक्कम तिच्या अनुपस्थितीमध्ये ठेवली असावी तिला या रक्कमेची काहीच माहिती नाही.

मागिल महिन्यात शिक्षक नोकर भरतीमधील घोटाळ्यात ममता बॅनर्जींच्या कॅबिनेट मधील शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांना ईडीने अटक केली आहे. यावेळी परदेशी चलनं आणि सोनं देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. हे देखील नक्की वाचा: WB SSC Scam: Arpita Mukherjee घरातील धाडेमध्ये Sex Toys देखील जप्त? रिपोर्ट पाहून सोशल मीडीयातही चर्चा .

चॅटर्जी यांनी देखील पैसे आपले नसल्याचं सांगत हात वर केले आहेत. सोबतच त्यांनी आपल्याला कट रचून सापळ्यात अडकवल्याचा दावा केला आहे. दरम्यान टीएमसी कडून त्यांचं मंत्रिपदही काढून घेण्यात आल्यानेही त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. का ज्येष्ठ टीएमसी नेत्यानेही त्यांच्यावरील कारवाई योग्य की अयोग्य हे काळ ठरवेल असं म्हटलं आहे. आता चॅटर्जी आणि बॅनर्जी दोघांनीही पैसे आपले नसल्याचं म्हटलं आहे.

दोघांनाही PMLA courtमध्ये बुधवार, 3 जुलै दिवशी दाखल केले जाणार आहे. उद्या त्यांची 10 दिवसांची ईडी कस्टडी संपणार आहे.