Mahua Moitra, Shashi Tharoor, Priyanka Chaturvedi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारतीय राजकारण एका विचित्र वळणावर येऊन ठेपले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आवज उठवणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर पाळत ठेवली जात असून त्यांचे फोनही टॅप करण्यात येत असल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), काँग्रेस खासदार शशि थरूर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra), AIMIM खासदार असदूद्दीन ओवैसी यांनी त्यांना Apple द्वारे इशारा देण्यात आल्याचे म्हटले आहे. या नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन अॅपलद्वारा देण्यात आलेल्या सावधगिरीच्या इशारा देणारे मेसेज आल्याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ज्यात म्हटले आहे की, त्याचे आयफोन (iPhones ) "राज्य-प्रायोजित हल्लेखोरां"कडून (State-Sponsored Attackers) लक्ष्य केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राजकीय नेत्यांन सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, महुआ मोईत्रा, प्रियंका चतुर्वेदी, शशी थरूर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासह भारतातील संसद सदस्यांच्या (खासदार) गटाला मंगळवारी (31 ऑक्टोबर) Apple कडून सावधगिरीच्या सूचना प्राप्त झाल्या. या सूचना कॅलिफोर्निया-येथील टेक जायंटकडून पाठविण्यात आल्याचे समजते. या सूचना संदेशात म्हटले आहे की, सदर युजर्सचे (खासदार) iPhones वर छेडछाडीच्या उद्देशाने "राज्य-प्रायोजित हल्लेखोरांनी" पाळत ठेवली होती. त्यामुळे तुमचा आयफोन जर हॅक होण्यापासून काळजी घ्या. त्यातील डेटा सुरक्षीत ठेवा.

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षांपासून मी ऍपल वापरकर्ता आहे. परंतु, मला कधीही राज्य-प्रायोजित हल्ल्याबद्दल इशारा देणारा संदेश मिळाला नाही. केंद्र सरकार विरोधी नेत्यांवर पाळत ठेवत आहे. हे तुम्ही समजू शकता. चतुर्वेदी यांनी त्यांच्या X पोस्टवर दावा केला आहे की त्यांना त्यांच्या iPhone वर अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये आयपोनसोबत छेडछाड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

व्हिडिओ

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा यांनीही आपल्या X पोस्टवर दावा केला आहे की अ‍ॅपलकडून मजकूर आणि ईमेल प्राप्त झाला आहे ज्यामध्ये सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हटले आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी अदानी आणि पीएमओ गुंडगिरी - तुमच्या भीतीमुळे मला तुमची दया येते, असा टोलाही लगावला आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही अॅपलकडून सावधगिरी सूचना मिळाल्याचे सांगितले. तसेच या प्रकाराची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले की, आपणास प्राप्त झालेला सावधानतेचा इशारा अ‍ॅपल आयडी -notifications@apple.com वरून प्राप्त झाला. ज्याची आपण पडताळणी केली आहे. त्यात तथ्य आहे. त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवल्यामुळे अनेक बेरोजगारांना काम मिळाले याचा मला आनंद आहे. बस त्यापेक्षा यात आणखी काही नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकाच वेळी अनेक खासदारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे आणि त्यांना आलेल्या संदेशांमुळे या घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या घटनेमुळे सायबर हेरगिरी प्रकरणात राज्य सरकारांच्या संभाव्य सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याने डिजिटल सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत, विशेषत: भारतातील सार्वजनिक व्यक्ती आणि राजकीय प्रतिनिधींच्या मुलभूत हक्कांबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे.