Anti-Naxal Operation on the Chhattisgarh Border: नक्षलवादी- पोलिस यांच्यात गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर चकमक, तीन पोलिस शहीद
Representative Image

छत्तीसगड-गडचिरोली सीमेवर (Chhattisgarh Border) छोडाजुलिया मध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर हल्ला केला आहे. यामध्ये 3 पोलिसांचं निधन झालं आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यानी आधी स्फोट केला आणि नंतर पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान या हल्ल्यात अजून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला बुधवारी रात्री झाला आहे. त्यानंतर रात्रभर चकमक सुरू होती. या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलिसांची अजून कुमक बोलावण्यात आली आहे. नक्षलवादी जंगलात लपून बसले असल्याची शक्यता असल्याने या ठिकाणी पोलिसांचे सर्च ऑपरेशन देखील सुरू झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून वायर, जिलेटिनच्या कांड्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत. या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

दहा दिवसांपूर्वी छत्तीसगड- गडचिरोली सीमेवर अशाच एका चकमकीमध्ये पोलिसांनी एकून 36 लाखाचे इनाम असलेल्या 4 नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. सी 60 कमांडोंसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार नक्षलींंचा अंत झाला होता.