Andhra Pradesh Train Accident Update and Videos: आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढू लागी आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ही संख्या 13 इतकी झाली असून त्यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे. इतर मृतदेहांची ओळख पठविण्याचे काम सुरु आहे. या शिवाय अजूनही बचाव आणि मदत सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम-रगडा पॅसेंजर ट्रेनची त्याच मार्गावरील विशाखापट्टणम-रगडा ट्रेनला धडक बसल्याने अपघाताची ही घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली. ट्रेन एकमेकांना धडकताच दोन्ही बाजूचे अनेक डबे रुळावरुन घसरले. ज्यामुळे जीवितहानी झाली. अनेक जखमी झाले. ट्रेनचेही मोठे नुकसान झाले.
जीवितहानी आणि जखमी: ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विश्वजित साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अंदाजे 50 लोक जखमी झाले आहेत. एएनआच्या वृत्तात मात्र मृतांची संख्या 13 सांगण्यात आली आहे. बचाव कार्य पूर्ण झाले आहे, आता ट्रॅक पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित आहे. अडकलेल्या प्रवाशांसाठी बसेस आणि गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक रेल्वे सेवा रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत, असेही साहू म्हणाले.
संभाव्य मानवी त्रुटी: ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) सूचित करते की मानवी चुकांमुळे विझियानगरम जिल्ह्यात दोन ट्रेनची टक्कर झाली असण्याची शक्यता आहे. ईसीओआर सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले की, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने सिग्नल ओव्हरशॉट केला असावा, परिणामी टक्कर झाली. दरम्यान, घटनेची चौकशी सुरु आहे. लवकरच निश्चित कारण पुढे येईल, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढवा: सौरभ प्रसाद, वॉल्टेअर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक, यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की, दोन पॅसेंजर ट्रेन लगतच्या ट्रॅकवर धावत होत्या, मागील ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केले होते. परिणामी, पाच डबे रुळावरून घसरले, त्यात तीन पुढचे आणि दोन मागचे. एसडीआरएफ, एनडीएफ आणि रेल्वे कर्मचार्यांसह बचाव पथक प्रवाशांना मदत करण्यासाठी काम करत आहेत, 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
व्हिडिओ
#UPDATE | Andhra Pradesh train accident: So far 13 people have died, out of which 7 have been already identified and the process to identify bodies is underway: Deepika, Vizianagaram SP https://t.co/1JCN3Yl83f
— ANI (@ANI) October 30, 2023
सरकारी मदत उपाययोजना: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने अपघातग्रस्त व्यक्तींसाठी भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना (कुटुंबीय) 10 लाख रुपये, तर गंभीर जखमींना 2 लाख रुपये दिले जातील. मृतांमध्ये इतर राज्यातील नागरिकांचा समावेश असेल तर शोकग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये नुकसानभरपाई म्हणून दिली जाईल.
जखमींची माहिती: विझियानगरम जिल्हा प्रशासनाने नोंदवले की किमान 40 लोक जखमी झाले आहेत, ज्यात चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी विविध रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एक्स पोस्ट
Please contact the helpline Number regarding Train Accident near Kantakapalle. pic.twitter.com/8TctOI4QKO
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 29, 2023
तात्काळ मदत आणि उपचार: मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम आणि अनकापल्ली, विझियानगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून रुग्णवाहिका त्वरित तैनात करण्याचे आदेश दिले. याशिवाय, जखमींना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी जवळपासच्या रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.