Andhra Pradesh Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh Accident) राज्यातील कृष्णा जिल्ह्यात (Krishna District) झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (14 जून) पहाटे घडली. कापलेल्या झाडांच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात व्हॅनची कंटेनर ट्रकला धडक बसून सीथनापल्लीजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले की, व्हॅनने ट्रॅक्टरला धडक दिल्याने कंटेनर पलटी झाला. अपघाताचा व्हिडिओ (Accident Video) व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. घटनेनंतर पुढचे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

पाच जणांचा जागीच मृत्यू

मछलीपट्टणमचे डीएसपी सुभानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात नेमका का घडला या कारणाचा तपास सुरू आहे. इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अधिक माहिती अशी की, अशोक लेलँड कंपनीचा ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लाकडी लाकूड वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळला. ज्यामुळे चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि हा अपघात घडला. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका पीडितेचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघाताचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अपघाताची तीव्रता पाहायला मिळते. (हेही वाचा, Pune Hit And Run Accident: पुणे जिल्ह्यात पुन्हा 'हिट अँड रन'; पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे भरधाव कारने तरुणीला चिरडले (Watch Video))

दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

आंध्र प्रदेश राज्यातील क्रुथिवेन्नू मंडळातील सीथनापल्ली गावात हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी एका ट्रकमध्ये दहा जण होते आणि दुसऱ्या ट्रकमध्ये चालक आणि एक सहाय्यक होता. घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातामुळे या मार्गावर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू केले.  (हेही वाचा, Pune Porsche Accident Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरपीच्या वडिलांसह चौघांवर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल)

व्हिडिओ

पहाटेच्या वेळी अपघात

स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शिंनीसांगितले की, पहाटेच्या अंधारात वातावरण शांत असताना एक मोठा आवाज झाला. ज्यामुळे परिसरातील नागरिकांना काहीतरी घडल्याची माहिती मिळाली. पहाटेची वेळ असली तरी अद्यापही लोक झोपेतून जागे झाले नव्हेत. त्यामुळे लोकांना सुरुवातीला नेमके काय घडले याचा अंदाज आला नाही. परंतू, परिसरातील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर त्यांना अपघाताबद्दल माहिती मिळाली. स्थानिकांना पुढच्या काहीच मिनिटांमध्ये अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज आला. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच, प्राप्त परिस्थितीमध्ये मदत आणि बचाव कार्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रस्त्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांना काहीसा वेळ लागला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.