पायलटच्या प्रसंगावधानामुळे IAF Jaguar या वायुसेनेच्या विमानाचा अपघात टळला
Jaguar Aircraft Accident (Photo Credits: ANI)

हरियाणा येथे वायुसेनेच्या जगुआर विमानाला (Jaguar Aircraft) एका पक्षाची धडक झाल्याने विमानाचे तातडीने लँडिंग करण्यात आले. अंबाला एअरफोर्स स्टेशनवरुन (Ambala Air Base) या विमानाने उड्डाण केल्यावर विमानाला पक्षाची धडक झाली. त्यानंतर विमानाचे एक इंजिन खराब झाले. पायलटने प्रसंगावधान राखत विमानाच्या इंधनाच्या टाकीचा भाग खाली पाडला आणि त्यानंतर सुरक्षितपणे विमान उतरवले.

पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. त्याचबरोबर यात कोणतेही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

ANI ट्विट:

काही दिवसांपूर्वी आसामच्या जोरहाट येथून उड्डाण घेतल्यानंतर भारतीय वायुसेनेचे एएन-32 विमान बेपत्ता झाले होते. यात 13 लोकं होते. यात आठ क्रु मेंबर्स आणि पाच प्रवाशांचा समावेश होता. मात्र या दुर्घटनेत 13 लोकांचाही मृत्यू झाला.