Amit Shah on CAA | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने आता लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसली असून लवकरच इतर जागेवरही आपले उमेदवार घोषीत करणार असून सध्या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्याचे काम ही सुरु आहे.  यासाठीच भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे 5 मार्च रोजी विदर्भ दौऱ्यावर आहे. पश्चिम विदर्भ दौऱ्यातील सहा लोकसभांचा आढावा घेण्यासाठी, तसेच त्यात पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणार आहे. (हेही वाचा -  LokSabah Election 2024: भाजपच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, PM मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार)

विदर्भातील सहा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी 5 मार्च रोजी अकोला जिल्हा दौच्यावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जलसा येथे त्यांच्या पक्षाची बैठक पार पडणार आहे. या हॉटेल जलसाची आज अकोला पोलिसांकडून पूर्वतयारी म्हणून पाहणी करण्यात आली आहे.  यामध्ये भाजपचे महानगर अध्यक्ष विजय अग्रवालसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे हे उपस्थित होते. आज सायंकाळच्या सुमारास त्यांनी पाहणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम-यवतमाळ आणि बुलढाणा या चार आणि चंद्रपुर, वर्धा या लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहे. या जिल्ह्यातील एकत्रित 400 भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत सवांद साधणार आहे.