केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरुद्ध पेटलेल्या शेतकर्यांनी आज 'भारत बंद' (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. आजच्या 'भारत बंद' सोबतच देशभरात शेतकरी आंदोलन देखील अधिक मजबूत झालं आहे. या घडामोडींमध्येच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संध्याकाळी 7 वाजता शेतकरी नेत्यांसोबत एक बैठक आयोजित केल्याचं वृत्त समोर आले आहे. दरम्यान उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला शेतकरी नेते आणि केंद्र सरकारची बैठक प्रस्तावित होती मात्र आज अचानक शेतकरी नेते आणि अमित शाह यांची विशेष बैठक आयोजित झाल्याने देशभरात शेतकरी एकवटल्याने निर्माण झालेली कोंडी फुटणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
दरम्यान शेतकरी नेत्यांना नव्या कृषी कायद्यांमधून 3 कायदे काढून टाकावेत अशी ठाम मागणी आहे. या शेतकरी आंदोलनामध्ये भारतीय किसान युनियन ही शेतकरी संघटना आघाडीवर आहे. त्यांच्याकडूनच अमित शाह यांनी बैठकीचं आमंत्रण दिल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान आज संध्याकाळी त्यासाठी बैठक होईल असेदेखील सांगण्यात आले आहे. Bharat Bandh: भारत बंदला बँक कर्मचाऱ्यांचे समर्थन, सरकारचा निषेध करण्यासाठी विविध युनियन एकत्रित येणार.
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिलेल्या मीडिया दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 7 वाजता अमित शाह शेतकरी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी शेतकरी नेते ते सिंधू बॉर्डरवर आंदोलक शेतकर्यांना भेटणार आहेत. पुढे शेतकरी नेते अमित शाह यांच्या भेटीला जातील. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही अनौपचारिक भेट असेल. यामध्ये 13 शेतकरी नेत्यांचा समावेश असेल. यापूर्वी 5 वेळा शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत बैठका झाल्या आहेत.