Delhi Rain: दिल्लीत पावसाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, 32 वर्षांनंतर जानेवारीत 69.8 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद
Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Delhi Rain: दिल्लीत पावसाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. थंडीच्या वातावरणात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने 32 वर्षांचा विक्रम मोडला आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत 69.8 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 32 वर्षांपूर्वी म्हणजे 1989 मध्ये 79.7 मिमी पाऊस पडला होता. राष्ट्रीय राजधानीच्या नरेला भागात 8.5, नजफगडमध्ये 10.0, आर्यनगरमध्ये 19.0. लोधी रोड 18.0, सफदरगंज 19.3 आणि पालम 19.4 मिमी पावसाची नोंद झाली.

दिल्लीशिवाय गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि गुरुग्राममध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानुसार आजही आकाश ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाची शक्यता आहे. (वाचा - Weather Updates in India: दिल्ली-यूपीसह उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर; 'या' राज्यांमध्ये पडणार पाऊस)

शनिवारी सर्वाधिक 14.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहितीही हवामान खात्याने दिली आहे. तर किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस होते. आज रविवारीही पावसाची शक्यता असून कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर आपण किमान तापमानाबद्दल बोललो, तर ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

येत्या काही दिवसांत धुके पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 26 जानेवारीला दिल्लीत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी सोमवारपासूनच हलके धुके दिसण्यास सुरुवात होईल. दिल्लीत पाऊस पडल्याने हवा अजूनही स्वच्छ नाही. दिल्लीत शनिवारी AQI 316 होता. दुसरीकडे, गाझियाबाद आणि नोएडामधील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत राहिली आहे.