Akhilesh Yadav | (Photo Credit - Twitter)

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आता काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यादवांनी काँग्रेस पक्षाला (Congress Party) 17 जागांची ऑफर दिली आहे. काँग्रेसने मुरादाबाद आणि बलिया या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित आहे. त्यावर अजूनही चर्चा सुरु आहे. मुरादाबादच्या जागेवर समाजवादी पक्षाने विजय मिळवला होता. त्यामुळे बलियाच्या जागेवर समाजवादी पक्ष मजबूत असल्याचे बोलले जात आहे. समाजवादी पक्षाकडून काँग्रेस पक्षाला ही शेवटची ऑफर देण्यात आली आहे. (हेही वाचा - JP Nadda President Term Extended: भाजपने वाढवला जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ)

पाहा पोस्ट -

काँग्रेस पक्षाने आज रात्रीपर्यंत 17 जागांच्या ऑफरवर सहमती दर्शवली नाही तर भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार नाहीत, असा अल्टिमेटम अखिलेश यादव यांनी दिला आहे. सर्व जागांवर एकमत झाल्यानंतरच काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल, असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. अखिलेश यादवांनी मुजफ्फरनगर आणि गाजीपूर सारख्या महत्वपूर्ण जागांचे उमेदवार जाहिर केले आहेत. मुजफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय गाजीपूरमधून मुख्तार अंसारी यांचे भाऊ अफजाल अंसारी यांना उमेदवारी देण्यात आलीये.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. जागावाटपाबाबत काँग्रेससोबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या या यादीत 11 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सपाच्या या यादीत अनेक जुने चेहरे आहेत, ज्यांना सपाने पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.