Flight (PC - Pixabay)

Air Travel: विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मोठा झटका बसणार आहे. आता विमानाने प्रवास करणं महाग होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमानाचे इंधन म्हणजेचं एटीएफ (Aviation Turbine Fuel) 4.2 टक्क्यांनी महागले आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत, एटीएफच्या किमती 3,232.87 रुपये प्रति किलोलीटर किंवा 4.25 टक्क्यांनी वाढून 79,294.91 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचल्या आहेत. या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफची किंमत वाढली आहे. (वाचा - Fire At Mumbai Airport: मुंबई विमानतळावर दुर्घटना थोडक्यात टळली, Air India कंपनीच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनास आग (WATCH VIDEO))

या महिन्यात एटीएफच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ

जानेवारी 2022 मध्ये याआधीही एटीएफच्या किमतीत वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी विमान इंधनाची किंमत 2,039.63 रुपये प्रति किलोलीटर किंवा 2.75 टक्क्यांनी वाढली होती आणि त्या वेळी ती 76,062.04 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली होती. मात्र, त्याआधी डिसेंबरमध्ये एटीएफच्या किमती दोनदा कमी करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, नोव्हेंबरच्या मध्यात जेट इंधनाची किंमत 80,835.04 रुपये प्रति किलोलीटरच्या उच्चांकावर होती. त्याच वेळी, 15 डिसेंबर रोजी, एटीएफच्या किमती 6,812.25 रुपये प्रति किलोलीटर किंवा 8.4 टक्के कमी केल्या गेल्या. परंतु, पुन्हा एकदा एटीएफच्या किमतीत वाढ झाली आहे.

महिन्यातून दोनदा किमतीवर संशोधन -

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेट इंधनाच्या किमती 1 आणि 16 तारखेला महिन्यातून दोनदा संशोधन केले जाते. या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत बरीच अस्थिरता आली आहे. ब्रेंट क्रूड तेल 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रति बॅरल 82.74 डॉलर वर होते. त्याच वेळी, 1 डिसेंबरला ही किमत प्रति बॅरल 68.87 डॉलर पर्यंत खाली आली. तेव्हापासून त्याच्या किंमती वाढत आहेत आणि ते प्रति बॅरल 85 डॉलर पर्यंत पोहोचले आहे.