मागील 60 वर्षांपासून एअर इंडियाच्या (Air India) फ्लाईट अटेंट्न्ड चा ड्रेस हा साडी आहे. पण या वर्ष अखेरीपर्यंत एअर इंडिया त्यांच्या महिला कर्मचार्यांसाठी नवा युनिफॉर्म उपलब्ध करून देणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांना नवा युनिफॉर्म मिळणार असल्याची चर्चा आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार, Designer Manish Malhotra एअर इंडियाचा नवा लूक डिझाईन करणार आहे.
साडी हा भारतीय महिलांचा पारंपारिक वस्त्रांपैकी एक असला तरीही त्याला मागे सारत थोडा मॉर्डन टच देत भारतीय संस्कृतीमधील ड्रेसच त्याला पर्याय दिला जाणार असल्याची शक्यता आहे. HT च्य रिपोर्ट्सनुसार साडी नेसण्यापेक्षा रेडी टू वेअर साडीचा देखील विचार केला जाऊ शकतो पण अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. An Air India प्रवक्त्यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे.
1962 पर्यंत, एअरलाइनच्या महिला क्रू स्कर्ट, जाकीट आणि टोपी घालत होत्या. नंतर त्यांना साड्या देण्याची कल्पना जेआरडी टाटांची होती आणि पहिली साडी बिन्नी मिल्सकडून घेण्यात आली होती.
आता नवा क्रू युनिफॉर्म A350 लॉन्च झाल्यानंतर समोर येईल अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकार्यांनी दिली आहे.