Air India (PC - Twitter)

एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सने आपल्या रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक सामूहिक रजा घेणाऱ्या 30 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतल्यानंतर काही फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एअर इंडियाने कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच इतर कर्मचाऱ्यांना देखील इशारा दिला आहे.  एअर इंडिया एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्स सामूहिक आजारी सुट्टीवर गेले होते. काल एअर इंडियावर 100 हून अधिक कर्मचारी सामूहिक सुट्टीवर गेल्याने 70 अधिक विमाने रद्द करण्याची नामुश्की कंपनीवर ओढावली होती. तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल देखील बंद केले होते. (हेही वाचा -  Air India Express Airlines Flight Cancellation: एअर इंडिया एक्सप्रेसच्या 25 कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई)

शेकडो क्रू मेंबरने अचानक आजारी सुट्टीवर गेल्याने एअर इंडियाला अचानक 13 मेपर्यंतची काही उड्डाणे रद्द करावी लागली. मंगळवारी रात्री 100 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच यावेळी 15000 प्रवाशांना फटका बसला.  यामुळे कंपनीला देखील मोठे आर्थिक नुकसान हे सहन करावे लागले. तसेच कर्मचाऱ्यांनी अचानकच सामुहीक रजा टाकल्याने कंपनीला आता प्रवाशांना झालेल्या नुकसानाचा परतावा हा करावा लागणार आहे. कंपनीच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे.

दरम्यान कंपनीने प्रवाशांची माफी मागत पोस्ट करत म्हटलं की, 'विमानतळावर अचानक उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांची माफी मागतो. प्रवाशांना होणाऱ्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. विमानतळावर पोहोचण्यापूर्वी तुमची फ्लाइटविषयी माहिती जाणून घ्याल, तुमच्या तिकीटाच्या रिफंडसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या '.