Air India कंपनीची मालकी Tata Group कडे आल्याच्या वृत्ताचे DIPAM कडून खंडण
Air India | (Photo Credits: Facebook)

भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) अधिगृहीत करण्यासाठी टाटा समूह (Tata Group) द्वारा लावण्यात येणाऱ्या बोलीस मंजूरी मिळाल्याचे वृत्त निराधार असल्याचे पुढे आले आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन (Department of Public Property Management) म्हणजेच दीपम (DIPAM) विभागाने या वृत्ताचे खंडन केले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ता म्हटले होतेकी, एअर इंडिया अधिग्रहण करण्यासाठी टाटा समूहाने लावलेली बोली स्वीकारण्यात आली आहे. केंद्र सरकारने म्हटले की, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, एअर इंडियाला लावण्यात आलेली बोली सरकारने मंजूर केली आहे. हे वृत्त सारासार निराधार आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन (Department of Public Property Management) विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये संकेत देण्यात आले आहेत की, सरकारने एअर इंडिया अधिकग्रहण प्रक्रियेत आर्थिक बोलीला मंजूरी दिली आहे. हे वृत्त निराधार आहे. या विभागाने म्हटले आहे की, जेव्हा या संदर्भात सरकारद्वारा निर्णय घेतला जाईल तेव्हा प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली जाईल. (हेही वाचा, Tata Group कडून केले जाणार आता Air India चे परिचालन, सर्वाधिक रक्कम लावत जिंकली बोली)

एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाइसजेट यांनी बोली लावली आहे. सरकारने नुकतेच म्हटले की, टाटा आणि स्पाईसजेटची वित्तीय बोलीचे मुल्यांकन सुरु आहे. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीच्या खासगिकरण प्रक्रियेचा पुढचा टप्पा वाढला आहे. सरकार हा व्यवहार लवकरच पूर्ण करेन.

ट्विट

वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे की, अघोषीत आरक्षीत मूल्य या आधाराव बोलीचे मुल्यांकन केले जात आहे. जी बोली मानक मुल्यापेक्षा वाढीव भावाने सादर करण्यात आली आहे. टाटाची बोली जर यशस्वी झाली तर एअर इंडिया 67 वर्षांनी पुन्हा एकदा मीठ ते सॉफ्टवेअर बनविणाऱ्या समूहाचा भाग ठरेन. दरम्यान, टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाईन्स नावाने कंपनी स्थापन केली होती. सरकारने 1953 मध्ये एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण केले होते. टाटा पहिल्यापासून सिंगापूर एअरलाईन्ससोबत विमान सेवा विस्तार करत आहे.