Representational Image | Indian Railways (Photo Credits: PTI)

रेल्वेची ऑनलाईन साइट आयआरसीटीसी (IRCTC) वरुन तिकिट बुकिंग करणे म्हणजे एक मोठं आव्हानच झालय. त्यात जर सीझनच्या वेळी चुकून माकून तुम्हाला मनासारखं आरक्षित तिकिट मिळालं तर नवलंच. असं असताना गुजरातच्या एका मातब्बर एजंटने एका मिनिटांत तब्बल 426 रेल्वे तिकिटे आरक्षित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार इतका विचित्र आहे की IRCTC चे अधिकारी ही चक्रावून गेले आहेत. इतक्या कमी वेळात इतकी तिकिटे बुक करणा-या या एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार एजंटचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मोहसिन इलियास जालियनवाला असे या एजंटचे नाव आहे. IRCTC वरुन एक तिकिट बुक करण्यासाठी 90 सेकंद लागतात. मात्र मोहसिनने एक मिनिटांच्या आत 11.17 लाख रुपयांची 426 आरक्षित तिकिटे बुक केली आहेत. हा वेग तिकिट आरक्षित करण्याच्या किमान वेळेपेक्षा 400 पटींनी जास्त आहे. हेही वाचा-

खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

RPF निरीक्षक ग्रेसियस फर्नांडिस यांनी सांगितले आहे की, एक रेल्वे एजंट त्याच्या खासगी आयडीवरुन इतके तिकिटे बुक करु शकत नाही. मात्र मोहसीनने तेही करुन दाखवत एवढी तिकिटे आरक्षित केली आहेत. जालियनवालाने तिकिटे काढण्यासाठी बाजारात मिळणा-या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरपैकी कोणते तरी एक सॉफ्टवेअर वापरले आहे. त्यामुळे RPF ने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-

IRCTC Tatkal Train Ticket: रेल्वे तात्काळ तिकीट बुकींगच्या बदललेल्या वेळा आणि नियम

जालियनवाला फरार असून 426 तिकिटांपैकी 139 प्रवाशांचा प्रवास अद्याप सुरु झालेला नसल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले आहे. या 139 तिकिटांना ब्लॉक करण्यात आले असून त्या प्रवाशांना तशा सूचना दिल्या आहेत. या तिकिटांची किंमत 5.21 लाख रुपये इतकी आहे.