प्रातिनिधिक प्रतिमा pc File image

उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. आरोप आहे की, येथे एका सासूने आपल्या सुनेच्या प्रेमात पडून तिला अनेकवेळा शारीरिक संबंध (Physical Relations) ठेवण्यास भाग पाडले. सध्या या प्रकरणी जगदीशपूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अहवालाची नोंद करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, महिलेचा विवाह उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील आलोक उपाध्याय याच्याशी 2022 मध्ये झाला होता. लग्नानंतरच महिलेचा विविध प्रकारे छळ सुरू झाला.

महिलेच्या सासूने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विविध प्रकारे दबाव टाकला आणि सुनेने यासाठी नकार दिल्यावर तिच्यावर ब्लेडने वार केले. महिलेने आपल्या नणंदेवरही आरोप केले की, तिने तिचे सर्व कपडे काढून घेतले होते, ज्यामुळे तिला जवळपास एक महिना एकाच ब्लाउज आणि पेटीकोटमध्ये राहावे लागले. यावेळी महिला घरातील एका खोलीत बंद होती. विवाहित महिलेचा आरोप आहे की, तिची सासू लेस्बियन आहे आणि तिने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेकवेळा छळ केला.

आपल्याकडे हुंड्याची नाहक मागणी करण्यात आली आणि त्यासाठी तिचा छळ करण्यात आला, असा आरोपही महिलेने केला आहे. रिपोर्टमध्ये महिलेने 2023 मध्ये तिला मुलगा झाल्याचे म्हटले आहे. पतीने त्या मुलाला बेकायदेशीर मानले आणि त्याला बेदम मारहाण केली. भांडणानंतर पिडीतेला घराबाहेर हाकलून देण्यात आले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मध्यस्थीने तिला पुन्हा घरात डांबून ठेवण्यात आले. (हेही वाचा: Ujjain Shocker: बलात्काराच्या अयशस्वी प्रयत्नानंतर 60 वर्षीय वृद्धाने महिलेच्या शरीराचे केले दोन तुकडे; आरोपी अटकेत)

महिलेचे वडील 2023 मध्ये तिला भेटायला गेले होते. यानंतर ती जगदीशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिच्या माहेरच्या घरी वडिलांसोबत राहू लागली. काही काळाने  सासरच्यांनी भांडण मिटवण्यासाठी तिला आणि तिच्या वडिलांना बोलावून घेतले. मात्र यावेळी भांडण अजूनच वाढले. आता या प्रकरणी महिलेच्या वतीने जगदीशपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जगदीशपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आनंद वीर सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून 22 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरावे गोळा करण्यात येत आहेत.