पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप (BJP) प्रणीत एनडीए (NDA) सरकारने 'अग्निपथ' (Agnipath Scheme) योनेंतर्गत काढलेल्या लष्कर भरतीवरुन देशभरातील युवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक युवकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु कले आहे. बिहार राज्यात मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बिहारमधील युवकांनी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेविरुद्ध (Agnipath Scheme Protest) आवाज उठवताना हिंसक मार्गाचा अवलंब करत विविध ठिकाणी टायर जाळले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला.
अग्निपथ योजनेला विरोध करताना बिहारमधील काको मोड नजीक आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग-83 आणि राष्ट्रीय महामार्ग-110 रोखून धरला. या वेळी केंद्र सरकार आणि या सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. जहानाबाद, नवादा आणि सहरसा येथेही मोठ्या प्रमाणावर हिंसा झाल्याचे वृत्त आहे. अनेक युवकांनी रेल्वे मार्गांवरच धरणे धरले. त्यामुळे काही काळ पटना-गया मार्गावरील रेल्वेमार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. (हेही वाचा, Agnipath Yojana: केंद सरकार कडून देशातील तरूणांसाठी लष्करभरतीची नवी प्रक्रिया जाहीर; पहा काय आहेत वैशिष्ट्यं!)
जहानाबाद येथे रेल्वे ट्रॅकवर जमलेल्या आंदोलकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याच्याही घटना घडल्या. पोलिसांनी वेळीच जमावावर नियंत्रण मिळवले आणि जमावाला रेल्वे रुळांवरुन हुसकावून लावले. नवादा, आरा आणि सहरसा येथेही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. आरा येथेही युवकांनी रेल्वेस्टेशनवर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.
ट्विट
Protests erupt in Bihar against Agnipath scheme, Army aspirants demand its withdrawal
Read @ANI Story | https://t.co/BniKN8PVjJ#Bihar #AgnipathRecruitmentScheme #Agnipath #Agniveer pic.twitter.com/VUd5Z0nSmw
— ANI Digital (@ani_digital) June 16, 2022
दरम्यान, सहरसा येथे लष्करभर्ती परिक्षा रद्द होणे आणि आयुर्मर्यादा कमी केल्याच्या विरोधात परीक्षार्थींनी रेल्वे रोको आंदोलन केले. आंदोलकांनी दिल्लीला जाणाऱ्या क्लोन हमसफर, वैशाली सुपरफास्ट आणि पटनालाजाणाऱ्या राजरानी सुपरफास्ट ट्रेन रोखून धरल्या. कैमूर जिल्ह्यातही युवकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्याचे वृत्त आहे. भभुआ रोड स्टेशनवर काही युवकांनी तोडफोड केल्याचे वृत्त आहे. दगडफेक झाल्याने इंटरसिटी एक्सप्रेसच्या काचाही फुटल्या. मुजफ्फरपुर, आरा, बक्सर, बेगूसराय येथेही मोठ्या प्रमाणावर आंदोलने होताना दिसत आहेत.