Agnipath Scheme Protest: 'अग्निपथ' विरोधात आंदोलन देशभरात तापले, बिहारमध्ये चार ट्रेनची जाळपोळ, बिहारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या घरावरही हल्ला
Agnipath Scheme Protest | (Photo Credit - Twitter)

केंद्र सरकार द्वारा लागू करण्यात आलेल्या नव्या अग्निपथ योजना (Agnipath Scheme) विरोधात देशभरातील युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सुरुवातीला बिहारमध्ये पेटलेली आंदोलनाची ही आग आता उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यांमध्येही भडकली आहे. देशभरात युवकांकडून हे आंदोलन (Agnipath Scheme Protest) सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. सर्वाधिक आक्रमक आंदोलन हे बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये बेतिया येथील आदोलकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बाजप नेते रणु देवी यांच्या घरावरच हल्ला केला आहे. उल्लेखनिय म्हणजे केंद्र सरकारकडून अग्निपथ योजनेत बदल केला असला तरीदेखील युवक आक्रमकच आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अनेक ठिकाणी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. काहींना अटकही झाल्याचे वृत्त आहे.

केंद्र सरकारने लष्कर भरतीमध्ये आगोदरचीच प्रणाली लागू करावी. केंद्र सरकारने लष्कर भरतीत केलेले नवे बदल हे मागे घ्यावेत, अशी प्रमुख मागणी हे आंदोलक करत आहेत. आंदोलक युवकांनी बिहारच्या बक्सर, समस्तीपूर, सुपौल, लखीसराय, मुंगेर आणि उत्तर प्रदेशातील बालिया, बनारस, चदौली आदी ठिकाणी जोरदार आक्रमकता दाखवली आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रल्वेगाड्यांनाच आगी लावल्या आहेत. काही ठिकाणी रेल्वे स्टशनमध्येही तोडफोड केल्याचे वत्त आहे. काही ठिकाणी लोकांनी रेल्वे रुळावर बसुन रेल्वेरोको करण्याचा मार्ग निवडला आहे. समस्तीपूर येथे जम्मूतवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन आंदोलकांन आगीच्या भक्षस्थानी घातली आहे. लखीसराय येथेही असाच प्रकार आढळून येत आहे. (हेही वाचा, Agnipath Scheme: अग्निपथ सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय)

ट्विट

दरम्यान, संपर्क एक्सप्रेसलाही आग लावल्याची माहिती आहे. ही ट्रेन दरभंगा येथून नवी दिल्लीला निघाली होती. आंदोलकांनी पहिल्यांदा ट्रेनमध्ये घुसुन जोरदार तोडफोड केली. त्यानंतर लूटालूट करुन ट्रेनला मोठ्या प्रमाणावर आग लावली. उत्तर प्रदेशातील बलिया पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार केल्याचे वृत्त आहे. अग्निपथ आंदोलनाची धक आता मध्य प्रदेशातील इंदौर पर्यंत पोहोचली आहे. मध्य प्रदेशातील लक्ष्मीबाई नगर स्टेशनवर 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आज मोठ्या प्रमाणावर आंदोलन हाती घेतले आहे. त्यांनी ट्रेनही रोकून धरल्या आहेत. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही पाहायला मिळत आहेत.

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, केंद्र सरकारने देशभरात होत असलेला विरोध पाहता अग्निपथ सैन्य भरती योजनेत काहीसा बदल केला. या योजनेंतर्गत आयुर्मर्यादेत बदल करत ही मर्याता 21 वरुन 23 वर्षाे इतकी करण्यात आली. सरकारने एका जाहीरातीद्वारे म्हटले आहे की, हा निर्णय केवळ येवढ्याचसाठी घेण्यात आला आहे कारण पाठिमागील दोन वर्षे भरतीच झाली नाही.