Mumbai Share Market | File Photo

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) 500 अंकांनी कोसळला आहे तर निफ्टीतही (Nifty) 160 अंकांची घसरण झाली आहे. आज सकाळीदेखील मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पहायला मिळली होती. यंदा 1 फेब्रुवारीला शनिवार आहे तरीही अर्थसंकल्पामुळे मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. मुंबईच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे मात्र बजेट 2020 निराशाजनक असल्याने मुंबई शेअर बाजारातही पडझड पहायला मिळाली आहे. Union Budget 2020 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे संसदेत बजेट वाचन सुरु, जाणून घ्या अशा गोष्टी ज्यांचा तुमच्यावर होणार परिणाम

 

ANI Tweet

आज अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्थावर मालमत्ता, उत्पादन क्षेत्र, एफएमसीजी यासह कृषी आणि वित्त संस्था , बँकांच्या शेअरवर नकारात्मक परिणाम दिसून आला. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाल्यानंतर काल (31 जानेवारी) सेन्सेक्स 190.33 अंकांनी खाली आला, तर निफ्टीमध्ये73.70 अंकांनी घसरला होता. आज सामान्यांसह गुंतवणूकदारांना बजेट 2020 कडून अपेक्षा होती मात्र त्यांची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पानंतर अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येतील, आणि बाजार उसळी घेईल, अशी आशा देखील आज फोल ठरली आहे.