इंटरनेटवर मुस्लिम महिलांना (Muslim Women) टार्गेट करण्याची प्रक्रिया काही संपायचे नाव घेत नाही. 'सुल्ली' आणि 'बुल्ली बाई' अॅप्सनंतर आता क्लबहाऊस (Clubhouse) चॅटमध्येही मुस्लीम महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाने (DCW) दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून क्लब हाऊस या ऑडिओ चॅट अॅपवर, मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. DCW ने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला ‘मुस्लिम मुली हिंदू मुलींपेक्षा जास्त सुंदर आहेत’, या विषयावरील गलिच्छ संभाषणात भाग घेणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास सांगितले आहे.
आयोगाने दिल्ली पोलिसांना आरोपींना तात्काळ अटक करून 5 दिवसांत सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अशा संभाषणावर आश्चर्य व्यक्त करताना, DCW चेअरपर्सन स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘कोणीतरी मला ट्वीटरवर क्लबहाऊस अॅपवरील विस्तृत ऑडिओ संभाषणामध्ये टॅग केले, त्यामध्ये मुस्लिम महिला आणि मुलींना लक्ष्य केले गेले होते आणि त्यांच्याविरूद्ध द्वेषपूर्ण लैंगिक टिप्पणी केली होती.’ (हेही वाचा: दारुसाठी गर्भवती बायकोने नवऱ्याला पैसे देण्यास दिला नकार, संपातलेल्या व्यक्तीने गळा दाबून केली हत्या)
सुल्ली बाई, फिर बुल्ली बाई और अब क्लब्हाउस ऐप पे मुस्लिम लड़कियों के ख़िलाफ़ अभद्र यौन टिप्पणी! ऐसा कब तक चलेगा?
मैंने क्लब्हाउस वाले मामले में दिल्ली पुलिस को नोटिस इशू किया है की जल्द FIR कर अपराधियों को अरेस्ट करें! pic.twitter.com/rGBj5y0QFq
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 18, 2022
निवेदनात म्हटले आहे की, ‘देशात अशा घटना वाढत आहेत, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची गरज आहे आणि म्हणून मी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे आणि याप्रकरणी एफआयआर दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.’ दरम्यान, याआधी बुल्ली बाई अॅपवर महिलांच्या फोटोचा लिलाव होत होता. बुल्ली बाई अॅपवरील ऑनलाइन लिलावात मुस्लीम महिला पत्रकार, वकील आणि विविध वयोगटातील कार्यकर्त्यांसह प्रतिष्ठित मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात आले होते. हा घृणास्पद ‘लिलाव’देखील सुल्ली लिलावारखाच होता.