Chandrayaan 2 Launch:  चांद्रयान अवकाशात झेपावलं; ISRO च्या ऐतिहासिक कामगिरीवर सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव
chandaryaan (Photo Credits: File Photo)

भारताची चंद्रमोहिम चांद्रयान 2 चं आज ( 22 जुलै) श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण झालं आहे. इस्त्रोच्या अनेक संशोधकांची मागील कित्येक महिन्यांची मेहनत सफल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावलं. त्यानंतर इस्त्रोच्या प्रमुखांनी या कामगिरीचं कौतुक करत चंद्रयान योग्य दिशेने अवकाशात झेपावलं असल्याची माहिती दिली आहे. इस्त्रोच्या या कौतुकास्पद कामगिरीनंतर भारतीयांची छाती अभिमानाने फुगली आहे. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रोच्या या दैदीप्यमान कामगिरीचं कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज या सारख्या राजकीय दिग्गजांसोबत सामान्यांसोबत समाजातील विविध स्तारातून या कामगिरीचं कौतुक होत आहे.  ISRO च्या दुसऱ्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेची 10 खास वैशिष्ट्यं

भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये इस्त्रोच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं आहे. सेलिब्रिटींमध्ये अक्षय कुमार, जॉन अब्राहम   विवेक ऑबेरॉय सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीसह अनेक राजकीय नेत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. Chandrayaan 2: ISRO च्या कामगिरीचा खेळाडूंनाही अभिमान, ट्विट करत केला अभिनंदनाचा वर्षाव

 सेलिब्रिटींच्या शुभेच्छा 

इस्त्रोच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हे चांद्रयान 2 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर पोहचेल. भारताने पहिले चांद्रयान ऑक्टोबर 2008 साली पाठवले होते. हे यान देखील मानव विरहित होते.जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाला 'बाहुबली' असं देखील संबोधलं जातं. याची किंमत सुमारे 375 कोटी असून चांद्रयान 2 साठी 603 कोटी खर्च केला आहे.