Tamannaah Bhatia and Sanjay Dutt | (Photo Credit - X)

Tamannaah Bhatia Summoned by Maharashtra Cyber: अभिनेत्री तमन्ना भाटिया आयपीएल सामन्यांच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग (Illegal IPL Streaming Case) प्रकरणी वादात अडकली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने तिला चौकशीसाठी समन्स बजावल्याचे सूत्रांकडून समजते. या समन्सनुसार अभिनेत्रीने 29 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याचे नावदेखील या प्रकरणात पुढे आले आहे. त्यालाही समन्स पाठविण्यात आले आहे. मात्र, पूर्वनियोजित व्यग्रतेमुळे तो चौकशीला उपस्थित राहू शकला नाही.

वायाकॉमचे करोडो रुपयांचे नुकसान

दरम्यान, वृत्तसंस्था ANI ने X वर पोस्ट केल्यानंतर तमन्ना भाटिया हीस आलेल्या नोटीसबाबत माहिती पुढे आली. ''महाराष्ट्र सायबरने अभिनेत्री तमन्ना भाटियाला फेअरप्ले ॲपवर IPL 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले ज्यामुळे वायाकॉमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. तिला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे'', असे वृत्तसंस्थेने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Tamannaah Bhatia च्या Kaavaalaa वर जेव्हा शाळकरी मुलं थिरकतात... (Watch Video))

संजय दत्त याने बदलून मागितली तारीख आणि वेळ

अभिनेता संजय दत्त यालाही या संदर्भात 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. मात्र. तो सायबर पोलिसांसमोर हजर झाला नव्हता. त्याऐवजी, त्याने आपला जबाब नोंदविण्यासाठी तारीख आणि वेळ बदलून मागितली होती. आपण पूर्वनियोजीत कामातील व्यग्रतेमुळे भारताबाहेर आहोत. त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यासाठी आपणास वेळ आणि तारीख बदलून मिळावी, अशी मागणी दत्त याने केल्याचे समजते. (हेही वाचा, Mahadev Online Gaming App: बॉलिवूड हादरलं! संजय दत्त, मलायका अरोरा, सुनिल शेट्टी, कपील शर्मा यांच्याह अनेक सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर, पाहा यादी)

बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग प्रकरण उघडकीस आले:

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर 2023 मध्ये, Viacom18 कडून IPL सामने प्रक्षेपीत करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक संपदा अधिकार (IPR) असल्याचा दावा करून तक्रार नोंदवली. ज्याद्वारे FIR दाखल करण्यात आला. असे असूनही, फेअर प्ले बेटिंग ॲपने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीरपणे सामने प्रवाहित करणे सुरू ठेवले. त्यामुळे Viacom18 ला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. त्यानंतर, बादशाह, संजय दत्त, जॅकलिन फर्नांडिस आणि तमन्ना यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात आले. डिसेंबर 2023 मध्ये बेटिंग ॲपच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.

एक्स पोस्ट

अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री तमन्ना भाटीया हे दोघेही बॉलिवूड कलाकार आहेत. सायबर पोलिसांची नोटीस आल्यानंर हे दोघे पुन्हा एकाद चर्चेत आले आहेत. संजय दत्त याआधीही अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे. खास करुन त्याच्यावर असलेल्या विविध आरपांमुळे आणि त्याला झालेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे.