Mithun Chakraborty: नक्षलवादी ते अभिनेता, खासदार आणि आता थेट राजकीय नेता; मिथून चक्रवर्ती यांच्याबाबत जाणून घ्या थोडक्यात
Mithun Chakraborty | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश (Actor Mithun Chakraborty Joins BJP) केला. मिथूनदा सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. त्यामुळे आता राजकारणात जाऊन ते काय करणार असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला काहीसे अधिकचे महत्त्व आहे. त्यात प्रतिमांचे आणि प्रतिकांचे राजकारण करणाऱ्या भाजपसारख्या पक्षाला मिथूनदा यांच्याबाबत आकर्षण नाही वटले तरच नवल. प्रदीर्घ काळ अभिनय आणि सिनेसृष्टीत घालवलेल्या मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या भजप प्रवेशाने ते चर्चे आले आहेत. परंतू, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते नक्षलवादाशीही संबंधित होते. सांगितले जाते की ते एके काळी नक्षलवादी (Naxalites) होते. पुढे ते अभिनय क्षेत्रात आणि त्यातूनही पुढे राजकारणात शिरले. अशा या मिथून चक्रवर्ती यांच्याबाबत या काही ठळक गोष्टी.

मिथून चक्रवर्ती यांनी अभिनय आणि चित्रपटसृष्टीत प्रवेशकेला. मात्र, तत्पूर्वी ते नक्षलवादी चळवळीशी संबंधित राहले होते. स्वत: नक्षलवादी असलेल्या मिथून चक्रवर्ती यांच्या बंधूंचा एका स्फोटामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी म्हणून मिथून चक्रवर्ती हे घरी परतले. पुढे त्यांनी नक्षलवादाशी फारकत घेत सिनेसृष्टीत पदार्पण केले. (हेही वाचा, Actor Mithun Chakraborty Joins BJP: अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश)

  • मिथून यांना डान्सची आवड होती. त्यामुळे त्यांनी अनेक डान्स शो केले. पुढे ते एका एक्टींग स्कूलमध्ये प्रवेशकर्ते झाले. फिल्म 'मृगया' मधून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. या चित्रपटास पुढे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पहिल्याच चित्रपटाला इतके चांगले यश मिळाल्यावर पुढे ते अभिनयातच रमले. त्यामुळे त्यांना आपण पट्टीचे अभिनेते झालो असे त्यांना वाटले खरे. परंतू, तो त्यांचा गैरसमज होता. त्यांचे अनेक चित्रपट पुढे सपशेल आपटले.
  • मिथून यांच्याकडे चित्रपट येण्याचे प्रमाण घटले. इतके की ते ना के बाराबर राहिले. जे मिळाले तेही आपटले. दरम्यान त्या काळात हेलन ही डान्सर म्हणून जोरदार प्रसिद्धीच्या झोतात होती. मिथून यांनी हेलनला असिस्ट करायला सुरुवात केली. पुढे त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोत एक चित्रपट मिळाला. तिथून पुढे मात्र मिथून यांचे नशीब चांगलेच फळफळले.
  • मिथून यांच्या खासगी जीवनाबद्दल सांगायचे तर त्यांनी योगिता बाली यांच्यासोबत विवाह केला आहे. योगिता या पहिल्या गायक किशोर कुमार यांच्या पत्नी होत्या. योगिता यांच्याकडून त्यांना मिमोह नावाचा एक मुलगाही आहे. तो सध्या चित्रपटसृष्टीतच कार्यरत आहे.

मिथून यांच्या राजकीय जीवनाबद्दल बोलायचे तर त्यांनी या आधी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तृणमू काँग्रेस पक्षाकडून ते राज्यसभेवर सदस्य म्हणूनही गेले होते. मात्र, चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. वयाच्या सत्तरीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही राजकीय इनिंग त्यांना कशी लाभते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.