धक्कादायक! कुटूंबातील आजारपणाला कंटाळून एका तरुणीने आई आणि कोमात असलेल्या भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, त्यानंतर केली आत्महत्या
Girl kills self after being harassed | Representational Image (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि त्यात बेरोजगार झालेले आयुष्य अशी अवस्था अनेकांची झाली आहे. त्यातच कुटूंबातील आजारपणाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणीने आपल्याच जन्मदात्या आईला आणि कोमात असलेल्या भावाला अन्नातून विष देऊन त्यांचे जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. एवढच नव्हे तर, त्यानंतर तिने स्वत: तेच अन्न खाऊन आत्महत्या केली. दैनिक भास्कर ने दिलेल्या वृत्तानुसार, लुधियानातील (Ludhiana) सोढीवाल येथे ही घटना घडली आहे. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणीचे नाव गुरप्रीत सिंह सोनी असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरप्रीत हिचा 37 वर्षीय भाऊ 7 वर्षांपूर्वी घराच्या छतावरून पडला होता. त्यानंतर तो कोमातच होता. त्यामुळे संपूर्ण कुटूंब मानसिक तणावाखाली होती. त्यातच मध्यंतरीच्या काळात गुरप्रीतची आई जसबीरही जखमी जाल्या होत्या.हेदेखील वाचा- Coronavirus in India: भारतात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ! 1,185 रुग्णांचा मृत्यू

घरातील आई आणि भाऊ दोघंही आजारी पडल्यानं मुलगी मनदीप कौरवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवस मानसिक त्रास सहन केल्यानंतर तिने अखेर आपल्या कुटुंबाला संपवलं आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मानसिक त्रासाला कंटाळलेल्या मनदीप कौरनं 12 एप्रिल रोजी अन्नात विषारी औषध मिसळलं आणि ते अन्न आपल्या आईला आणि कोम्यात असणाऱ्या भावाला खायला दिलं. शिवाय तिनेही तेच अन्न खाल्लं. यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले. त्यानंतर शेजारील महिलेच्या ही गोष्ट लक्षात आली. त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.