पंचतारांकित ताज हॉटेल मध्ये 102 दिवस राहून केली मजा; 25 लाखाचे बिल झाल्यावर झाला फरार
पंचतारांकित हॉटेल रूम (प्रातिनिधिक/संग्रहित-संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी एका पंचतारंकित हॉटेलने अभिनेता राहुल बॉस याला दोन केळी देऊन त्याचा जवळजवळ 450 दर जाऊन फसवणूक केली होती. आता अशाच एका पंचतारांकित हॉटेलला एका ग्राहकाने लाखो रुपयांना गंडा लावला आहे. हैदराबादचा (Hyderabad) एक व्यापारी ताज हॉटेलमध्ये तब्बल 102 दिवस थांबला आणि जेव्हा हे बिल 25.96 लाखाचे बिल झाले तेव्हा कोणालाही काहीही कल्पना न देता तो फरार झाला. हैद्राबादच्या ताज बंजारा हिल्स हॉटेलने (Taj Banjara) आता या व्यावसायिकाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या व्यावसायिकाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे.

आरोपी ए शंकर नारायण हा विशाखापट्टणमचा व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, शंकर नारायण यांनी एप्रिलमध्ये लक्झरी सुट बुक केली होती. इथे 102 दिवस राहिल्यावर त्याचे बिल 25 लाखाच्या वर गेले होते. हॉटेल मॅनेजमेंटने जेव्हा या व्यापाराला बिलाची मागणी केली तेव्हा, त्याने इतक्या मोठ्या बिलातून 13.62 लाख रुपये दिले. नंतर तो कोणालाही काहीही न सांगता हॉटेलमधून पळून गेला. यानंतर हॉटेल मॅनेजमेन्टने त्या व्यावसायिकाला फोन केला, तेव्हा त्याने आपण लवकरच ही बिलाची रक्कम भरू असे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करून ठेवला. (हेही वाचा: पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहकांची लुट, दोन केळांचे बिल पाहुन अभिनेता राहुल बोस अवाक, पहा Video)

हॉटेल ताज बंजारा हिल्सने आता या आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. रवी म्हणाले, हॉटेल व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी व्यावसायिकाचा शोध लागला असून, यासंदर्भात व्यापाराकडे विचारपूस केली जात आहे. मात्र आपण हॉटेलचे संपूर्ण बिल भरून बाहेर पडलो असल्याचे दावा या व्यावसायिकाने केला आहे. आपणाकडून मुद्दाम जास्त पैसे उकळण्यासाठी हॉटेल हा खेळ खेळत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.