मानवी सांगाडा ( फोटो सौजन्य - ANI )

गुवाहटी येथे एका प्लॉटचे खोदकाम करताना तेथे काम करणाऱ्या मजूरांना मानवी सांगाडा आढळल्याने त्यांची पळापळ झाली आहे. या सापडलेल्या सांगाड्यामुळे तेथे काम करणाऱ्या मजूरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.

गांधी वस्ती येथे एका मोकळ्या प्लॉटचे डेव्हलपिंग करण्याचे काम चालू होते. तर बुधवारी काही मजूर येथे खोदकाम करताना त्यांना अचानक मानवी सांगाडा सापडल्याने ते घाबरले. या घटनेची माहिती देण्यासाठी या कामकारांनी थेट पोलीस स्टेशन गाठून याबद्दल सांगितले आहे.

तर सापडलेल्या मानवी सांगाड्याच्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने पोहचून याबद्दलची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.