(Photo Credit- Pixabay)

Andhra Pradesh:  श्रावण शिंपिग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडेच्या कंटेरनमधून गोदामात केमिकलच्या पिशव्या भरत असताना अचानक बॅग फुटली. या केमिकलमुळे तीन महिलांसह पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना विशाखापट्टणममध्ये घडली. याची माहिती पोलिस आयुक्त शंक बत्रा बाग यांनी सांगितली.  पाच पैकी चार जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (हेही वाचा- अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीची मृतदेह, अयोध्या येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्रावण शिपिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामातून कंटेनरमध्ये भरत असताना केमिकल पावडरची पिशवी फुटली. या घटनेमुळे तीन महिलांसह पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार कामगारांची प्रकृती स्थिर आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्यांना सिंहगिरी रुग्णालयात गजुवाका येथील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

मंगळवारी, कडापा ते गुवुलाचेरी एका अपघात पाच जणांचा मृत्यू झाला. रामपुरम, सीआय वेंकट कोंडा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. कडप्पाहून गुव्वलाचेरुवूकडे जाणाऱ्या एका कंटेनर ट्रकची कारला धडक लागल्याने हा अपघात झाला.