याआधी बिहार भाजप मुख्यालय, तसेच बिहारच्या राजभवना (Raj Bhavan) मध्ये अनेक लोकांना कोरोन विषाणूची (Coronavirus) लागण झाल्याची बातमी आली होती. आता गुरुवारी तामिळनाडू (Tamil Nadu) राजभवनात कोरोनाचे 84 रुग्ण आढळले आहेत. त्यात, राजभवनामध्ये तैनात सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलामधील लोकांसह इतर 84 लोकांची कोरोन विषाणू चाचणी सकारात्मक आली आहे. राजभवनच्या वतीने निवेदन देताना असे म्हटले आहे की, यापैकी कोणताही कर्मचारी राज्यपाल किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संपर्कात आला नाही. सध्या संपूर्ण राजभवन व सर्व कार्यालये स्वच्छ व सर्वांचे निर्जंतुकीकरण केले जात आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संक्रमित लोकांना आरोग्य विभागाने आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. राजभवनातील काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसायला सुरुवात झाल्यावर एकूण 147 लोकांची कोरोनाची चाचणी झाली होती. त्यामध्ये 84 जणांन कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हे सर्व लोक राजभवनाच्या बाहेर, गेटवर काम करत होते. यातील कोणाचाही राजभवनाच्या आत संपर्क आला नाही. याआधी बिहारच्या पाटण्यातील राजभवनाच्या सुरक्षाविभागासह अन्य विभागांशी संबंधित 20 जण कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. (हेही वाचा: भाजप मुख्यालयानंतर बिहारच्या राजभवनात कोरोना व्हायरसचा शिरकाव; तब्बल 20 जणांना झाली लागण)
दरम्यान, तामिळनाडू राज्यात एकूण रूग्णांची संख्या 1,86,492 झाली आहे. यापैकी 3,144 लोक मरण पावले आहेत. तर आतापर्यंत 1, 31 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर, राज्यात 51 हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तामिळनाडूतील पलानीस्वामी सरकारने राज्यात पूल टेस्टिंग यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावर आरोग्य विभागाने बुधवारी काम सुरू केले. पूल टेस्टिंग तंत्रामुळे एकाच वेळी अनेक नमुन्यांची चाचणी घेणे शक्य होणार आहे आणि त्यासाठी खर्चही 75 टक्के कमी येणार आहे.