आंध्र प्रदेश: दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीचा शिक्षकाकडून लैंगिक छळ
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीचा शिक्षकाने लैगिंक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कृष्णा (Krishna) जिल्ह्यातील अगिरीपल्ली (Agiripalli) भागात ही धक्कादायक घटना 22 जानेवारीला घडली आहे. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. मानखुर्द परिसरात सामुहिक बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात

मुलींवरील अत्याचार, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चार वर्षांच्या एका मुलीवर दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोलकत्ता येथून समोर आली होती.