Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

पंतप्रधान मोदी 27 डिसेंबरला 'मन की बात'मधून जनतेला संबोधित करणार; 8 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Dec 08, 2020 11:51 PM IST
A+
A-
08 Dec, 23:51 (IST)

पंतप्रधान मोदी 27 [डिसेंबरला 'मन की बात'मधून जनतेला संबोधित करणार आहेत. ट्विट-

 

08 Dec, 23:47 (IST)

पंतप्रधान मोदी 27 [डिसेंबरला 'मन की बात'मधून जनतेला संबोधित करणार आहेत. ट्विट-

 

08 Dec, 23:22 (IST)

सरकार शेतीविषयक कायदे मागे घेण्यास नसल्याचे हन्नान मुल्ला, सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा यांनी सांगितले आहे.

08 Dec, 22:48 (IST)

मास्क बनविण्याच्या मशीनच्या पुरवठ्यावरून ठाणे येथील एका व्यक्तीने केरळ येथील व्यापाराची 74.50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. ट्वीट-

 

08 Dec, 22:19 (IST)

राज्यात आज 53 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.57 %  वर गेला आहे. ट्वीट-

 

08 Dec, 21:37 (IST)

जम्मू-काश्मीरमध्ये डीडीसीची निवडणूक आहे, लोकांना येथे विकास हवा आहे, या निवडणुकीत विकासासाठी मत आहे. ज्या लोकांनी आमच्याविरूद्ध टोळक्यांची स्थापना केली ते नाराज आहेत. ज्यांना गुप्त टोळी म्हणतात, त्यांना मी दिशाभूल करणारे टोळी म्हणतो, ते दिशाभूल करतात आणि ते स्वत: दिशाभूल राहतात, असे भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले आहेत.ट्विट-

 

08 Dec, 21:01 (IST)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतीच दहा लाख डॉलर्सचा ग्लोबल टीचर पारितोषिक जिंकलेल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक रंजीतसिंह डिसाळे यांचा सत्कार केला.

08 Dec, 20:39 (IST)

महाराष्ट्र: उपविभागीय कार्यालय, शिर्डी यांनी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेश न करण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यांचे इथे येणे कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात समस्या निर्माण करू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. जर देसाई यांनी आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना आयपीसी कलम 188 नुसार दोषी ठरवले जाईल.

08 Dec, 20:25 (IST)

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी टीआरपी हेरफेर प्रकरणी मुंबई पोलिसांकडून पुढील चौकशीसाठी स्थगिती मिळावी यासाठी बॉम्बे हायकोर्टाकडे धाव घेतली आहे.

08 Dec, 20:05 (IST)

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये अवैध मांस विकल्याच्या आरोपाखाली सात महिलांसह अठरा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

Load More

केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे परत घ्यावे या मागणीसाठी राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन आता अधिक तिव्र झाले आहे. हे आंदोलन भारतभर पसरविण्यासाठी आणि सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी आज (8 डिसेंबर) भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे 40 पेक्षाही अधिक संघटना या बंधमध्ये सहभागी झाल्या आहेत. सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत हा बंद शांततेच्या मार्गाने केला जाणार आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते बलबीर सिंग यांनी अवाहन केले आहे की, देशभरातील नागरिकांनी स्वत:हून बंदमध्ये सहभागी व्हावे. कोणत्याही अस्थापना, संस्था, सेवा, दुकाने किंवा इतर घटकांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी सक्ती करु नये. या शिवाय जे स्वयंस्फूर्थीने या बंदमध्ये सहभागी होतील त्यांचे स्वागत आहे, असेही बलबीर सिंह यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या बंदला महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी आगोदरच पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या बंदला महाविकासआघाडी सरकारचाही अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे स्पष्ट आहे. शिवाय आजच्या भारत बंदला माथाडी कामगारांनीही पाठिंबा दिला आहे. त्यासोबत एपीएमसी मार्केट नवी मुंबई यांचाही बंदला पाठिंबा आहे. त्यामुळे आज एपीएमसी मार्केट बंद राहतील, असे कालच स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, बंदला सुरुवात झाली असून, मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर आदी ठिकाणच्या बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. बाजार समित्या बंद असल्याने एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यांच्या गाड्यांवरही मर्यादा आल्या आहेत. कारण एपीएमसी मार्केटही बंद आहेत. त्यामुळे आज दिवसभरात नागरिकांना फळ आणि भाजीपाला तुटवडा भासू शकतो.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now