
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. जर का तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि तुम्ही तुमच्या वाढीव डीएची (Dearness Allowance) वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवरात्रीमध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट मिळू शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची औपचारिक घोषणा 28 सप्टेंबरला म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाऊ शकते. त्याचबरोबर 1 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात त्यांना मागील दोन महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही मिळणार आहेत.
यावेळी सरकार डीएमध्ये 4 टक्के वाढ जाहीर करणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निर्धारित करण्यासाठी सरकार AICPI-IW निर्देशांकाचा डेटा वापरते. AICPI-IW च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. जूनमध्ये निर्देशांक 129.2 वर पोहोचला आहे. निर्देशांकात झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे, डीएमध्ये 4 टक्के वाढ निश्चित असल्याचे मानले जाते.
कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या पगारात वाढलेल्या महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून वाढीव डीए लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांची थकबाकी म्हणून पैसे मिळतील. (हेही वाचा: सामान्यांसाठी दिलासा घेऊन आला सप्टेंबर महिना; कमर्शिअल गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी घट)
जाणून घ्या, 7 व्या वेतन आयोगानुसार, जर तुमचा मूळ पगार 31550 रुपये असेल आणि DA मध्ये 38 टक्के वाढ झाली असेल, तर तुमचा पगार किती वाढणार आहे-
मूळ वेतन - 31550 रुपये
महागाई भत्ता 38 टक्के - 11989 रु.
विद्यमान डीए – 34 टक्के – 10727 रु.
डीए किती वाढेल - 4 टक्के
मासिक पगार वाढ – 1262 रु.
वार्षिक पगारात वाढ – 15144 रु.
या सोबतच जर तुमचा मूळ पगार 18000 रुपये असेल, तर तुमच्या डीएमध्ये एकूण वार्षिक 6840 रुपयांची वाढ होईल, म्हणजेच तुमचा मासिक पगार 720 रुपयांनी वाढेल.