नवीन वर्ष सुरु होण्याआधीच बिहार मधील सरकारी शाळांतील शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. बिहारमधील विश्वविद्यालयातील शिक्षक तसेच कर्मचा-यांच्या पगारात सातव्या वेतन आयोगानुसार वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा सरकारी शाळांतील शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय असून यामुळे दिवाळीनंतरही त्यांना बोनस मिळाला असे म्हणायला हरकत नाही. शिक्षक आणि कर्मचा-यांना याचा फायदा हा नोव्हेंबर महिन्यापासूनच मिळणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार, राज्य शिक्षण विभागाने विश्वविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वेतनश्रेणीत वाढ केली आहे.
त्याच्यावर काम सुरु झाले असून येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत वेतनश्रेणी निश्चित केली जाईल. 7th Pay Commission: मोदी सरकार लवकरच सरकारी कर्मचार्यांना देऊ शकते खूषखबर, पगार वाढ होण्याची शक्यता
या निर्णयामुळे सर्व विश्वविद्यालयांच्या जवळपास 8,000 शिक्षकांना आणि 15,000 कर्मचा-यांना याचा लाभ घेता येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या पगारात 18 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत बिहारमध्ये शिक्षकांना तसेच तेथील कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जात आहे.
याआधी पश्चिम बंगालच्या सरकारने आपल्या लाखो शिक्षकांची मागणी पूर्ण करत सातवा वेतन आयोग लागू केला. सातव्या वेतन आयोगानुसार, येथील शाळा आणि महाविदयालयातील शिक्षकांना वेतनमान दिले जाईल. या निर्णयामुळे राज्य सरकारवर दरवर्षी 1,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.