75th Independence Day: आझादीचे अमृत महोत्सवी वर्ष नवी ऊर्जा घेऊन येवो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

संपूर्ण भारत देश आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Independence Day Amrit Mahotsav) साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही देशवासीयांना 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (75th Independence Day 2021) शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित करणार आहेत. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष (Azadi ka Amrit Mahotsav) आपणा सर्वांच्या आयुष्यात नवी चेतना, नवी उर्जा घेऊन येईल असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आगोदर म्हणजेच काल (14 ऑगस्ट) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की, यापुढे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी भयस्मृती दिन म्हणून पाळला जाईल. 14 ऑगस्ट या दिवशी भारताची फाळणी झाली. फाळणीच्या या वेदना कधीही विसरता येणार नाहीत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ट्विट

15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाले. परंतू, हे स्वातंत्र्य मिळताना अखंड भारताची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आली. लाखो लोक विस्थापित झाले. मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार झाला. भारताच्या एक दिवस आगोदर म्हणजेच 14 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत यंदा आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे.