Dead Body | Pixabay.com

कॅन्सर या आजाराचं नाव एकूणच रूग्णाच्या पायाखालाची जमीन सरकते. अशामध्ये त्याच्या उपचारासाठीचा खर्चाचा आकडा पाहून धीर अजूनच खचतो. बेंगळूरू मध्ये राज्य सरकारी नोकरी मधून निवृत्त एका कर्मचार्‍याला कॅन्सरचे निदान झाले. या व्यक्तीने त्याला Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB PM-JAY) senior citizen scheme अंतर्गत उपचारासाठी 5 लाखाची रक्कम नाकारल्यानंतर आत्महत्या करून आपलं आयुष्य संपावलं आहे.

"आम्ही AB PM-JAY ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार केले असूनही त्यांना 5 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर दिले आहे, तरीही किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी (KMIO) ने राज्य सरकारचे आदेश अद्याप आलेले नाहीत असे सांगून मदत नाकारली. मात्र त्यांनी आम्हाला 50% सवलत दिली," असे मृत वृद्धाच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितल्याचं TOI वृत्त आहे.

TOI शी बोलताना KMIO चे प्रभारी संचालक डॉ रवी अर्जुनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "AB PM-JAY ज्येष्ठ नागरिक योजना अद्याप लागू करणे बाकी आहे, आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत," राज्य सरकारने पुष्टी केली की त्यांनी अद्याप योजना लागू केली नाही आणि तिच्या निधीच्या पैलूंबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.

"आम्ही नुकतेच चाचण्या आणि स्कॅन सुरू केले होते आणि 20,000 रुपये खर्च केले होते. उपचारासाठी केमोनंतर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. आम्ही किडवई येथेच 2 केमो करण्याचं ठरवलं होतं. आम्ही पैसे द्यायला तयार होतो, पण त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी आत्महत्या केली." असे मृत वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले आहे.

AB PM-JAY ज्येष्ठ नागरिक योजना मध्ये 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण दिले जाते.

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.