पुण्यातील रुग्णवाहिका मिळत नसल्यास अधिकाऱ्यांना वाहनांमध्ये फिरण्याचा अधिकार नाही - मनसे नगरसेवक वसंत मोरे; 7 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Sep 08, 2020 12:04 AM IST
महाराष्ट्रामध्ये आजापासून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तर सचिवालयाला यंदा विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला त्यांचा कोरोना चाचणी आर टी पीसी आर टेस्टचा रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आमदारांसह त्यांचे सचिव, पत्रकार आणि इतर सुरक्षा कर्मचार्यांनादेखील कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.
मुंबई मध्ये आज सकाळपासून वीजंचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पहायला मिळाला. सुमारे 4.30- 5 वाजल्यापासूनच मेघगर्जना होत होती. मात्र पाऊस तुरळक बरसला आहे. मागील 3 तासांत अंदाजे 40-70 मीमी पाऊस झाला आहे. मात्र वेधशाळेच्या अंदाजानुसार, कोकणात मुसळ्धार पाऊस बरसू शकतो.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात काल रात्री 23 हजारांपेक्षा अधिक रूग्ण समोर आले तर देशात हा आकडा 90 हजारांच्या पार गेल्याने जागतिक क्रमवारीमध्ये देखील अमेरिकेपाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आहेत.