Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

CSK vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपरकिंग्ज संघावर 10 धावांनी विजय; तिसऱ्या विजयासह KKR टॉप 4 मध्ये; 7 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Oct 07, 2020 11:49 PM IST
A+
A-
07 Oct, 23:49 (IST)

CSK vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना जिंकत KKR संघ टॉप 4 मध्ये पोहचला आहे.

07 Oct, 23:31 (IST)

हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने हाथरस जिल्हा, अलीगड रेंजमध्ये ADG आणि DIG स्तरीय 2 विशेष अधिकाऱ्यांची 7 दिवसांसाठी नियुक्ती केली आहे. 

07 Oct, 22:49 (IST)

मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रणाकरिता नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. सामान्यांना आता किफायतशीर किंमतीत मास्क मिळणार आहेत व मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

07 Oct, 22:37 (IST)

झारखंड येथे 8 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळं उघडणार असून सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.

07 Oct, 22:19 (IST)

झारखंड मध्ये आज 829 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1087 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 89,702 वर पोहचला आहे. त्यापैकी 79,176 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 9759 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आतापर्यंत 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

07 Oct, 21:50 (IST)

तेलंगणा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी Dubbak मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून चेरुकू श्रीनिवास रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे.

07 Oct, 21:07 (IST)

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे कार्यकारी संचालक एम. राजेश्वर राव यांची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

07 Oct, 21:01 (IST)

मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांचा मृतदेह शिमला (हमाचल प्रदेश) येथील निवास्थानी लटकलेल्या अवस्थेत मिळाला, अशी माहिती शिमल्याचे एसपी मोहीत चावला यांनी दिली आहे.

07 Oct, 20:50 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 14,578 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 355 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 14,80,489, इतकी झाली आहे. यात मृत्यू झालेल्या 39,072, डिस्चार्ज मिळालेल्या 11,96,441 आणि प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,44,527 जणांचाही समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

07 Oct, 20:31 (IST)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचाराच्या निकषांमध्ये बदल केला आहे. नव्या नियमांनुसार कोरोना काळात मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्य राजकीय पक्षांसाठी जास्तीत जास्त 30 स्टार प्रचारक, अपरिचित नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी 15 स्टार प्रचारक निवडता येतील, असे आयोगाने म्हटले आहे.

Load More

संपूर्ण भारत देश कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात मोठी लढाई लढत असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांसमोर एखाद्या चट्टानासारखे उभे असलेले भारतीय जवान दहशतवाद्यांशी (Terrorist Attack) लढत आहे. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील शोपियनच्या सुगन (Sugan) भागात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दहशतवाद्यांचे या परिसरात छुपे हल्ले सुरु असून भारतीय जवानही त्यांना जशाच तसे उत्तर देत आहे. हे ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचे भारतीय सैन्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या जम्मू-काश्मीर मध्ये कुरघोडी करण्याचे प्रकार सुरुच असून भारतीय सैन्य ही देशाच्या रक्षणासाठी त्यांना धैर्याने तोंड देत आहेत.

तर दुसरीकडे देशात आतापर्यंत 56.6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते आता 84.7% इतके झाले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर मुंबईमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,17,090 वर पोहोचली आहे. यामध्ये आतापर्यंतच्या 9,199 मृत्यूंचा व 1,81,485 बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या मुंबईमध्ये 23,976 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Show Full Article Share Now