नरेंद्र मोदी (Image: PTI/File)

आजपासून नवा महिना सुरू झाला. मात्र ऑक्टोबर महिन्याचं बजेट सांभाळताना गृहिणींपासून ते घरातील प्रमुख कमवत्या व्यक्तीपर्यंत सार्‍यांनाच नव्याने आखणी करावी लागणार आहे. मोदी सरकारच्या नव्या नियमांनुसार काही गोष्टींमध्ये प्रामुख्याने बदल करण्यात आला आहे. मग पहा ऑक्टोबर महिन्यात कोणत्या सात नियमांमध्ये बदल होणार आहे.

1.व्याज दर वाढणार

ऑक्टोबर ते डिसेंबर या आर्थिक वर्षातील तीन महिन्याच्या काळातील ठेवींवर व्याजदर अधिक मिळणार आहे. यामध्ये पीएफ, सुकन्या, समृद्धी योजना,किसान विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांच्यावर मिळणार्‍या व्याजदरांवरही वाढ झाली आहे. या स्कीमवर पहिल्यापेक्षा 0.40 % अधिक व्याजदर मिळणार आहे.

2.  गॅस सिलेंडर महागला

ऑक्टोबर महिन्यापासून गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि गॅसचेही दर वाढले आहेत. अनुदानित एलपीजी गॅससिलेंडर 2 रूपये 89 पैशांनी तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 59 रूपयांनी महागला आहे.

3. कॉल ड्रॉप झाल्यास दंड

कॉल ड्रॉपमुळे वैतागलेल्या ग्राहकांना एक दिलासादायक बातमी आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कॉल ड्रॉप झाल्यास संबंधित कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे.

4. ई कॉमर्स

ई कॉमर्स कंपन्यांद्वारा जगभरात पोहचवल्या जाणार्‍या वस्तूंनादेखील आता 1% अधिक टीडीएस भरावा लागणार आहे. तसेच परदेशी कंपन्यांना एक एजंट नियुक्त करावा लागणार आहे.

5. TDS

TCSआणि TDSबाबत जीएसटी अंतर्गत नवे नियम लागू करण्यात आला आहे. 2.5 लाख रूपयांच्या वस्तू आणि सेवा पुरवठा झाल्यास त्यावर 1 % टीडीएस द्यावा लागणार आहे.

6. बीएसईच्या शुल्कामध्ये वाढ

आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून बीएसई कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमध्ये व्यवहार सुरू करणार आहे. या व्यवहारात पहिल्या वर्षभरात कोणतेही शुल्क न भरण्याचा निर्णय घेतला आहे.

7. PNBचं कर्ज महागणार

पंजाब नॅशनल बॅंकेने लहान मोठ्या मुदतीच्या कर्जाच्या दरांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे पंजाब नॅशनल बॅंकेकडून कर्ज घेणं महाग होणार आहे.