विशाखापट्टणम: टँकरमधून पुन्हा गॅस गळती, NDRF च्या सहकार्याने अग्निशमन दलाचे 50 कर्मचारी करत आहे कारवाई ; 7 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
May 08, 2020 12:06 AM IST
आज गौतम बुद्धांचा जन्म आणि निर्वाण दिन म्हणजेच बुद्धपौर्णिमा. बौद्ध धर्मीयांसाठी खास असणाऱ्या हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो. मात्र यंदा सर्वत्र कोरोना व्हायरसचे सावट असल्याने बौद्धपौर्णिमेच्या उत्सावाला साधं स्वरुप प्राप्त झालं आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रभाव देशभरात वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये काहीशी मोकळीक देण्यात आली आहे.
तसंच लॉकडाऊनमुळे अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाने 9-15 मे दरम्यान विशेष फ्लाईट्सची सोय केली आहे. तसंच प्रवासाच्या तिकीट दराची किंमत अमेरिकेच्या कोणत्या शहरातून भारतातील कोणत्या शहरापर्यंत प्रवास होणार आहे यावरुन ठरेल, असे वॉशिंग्टनमधील इंडियन एम्बासीकडून सांगण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचे संकट देशात अधिकाधिक तीव्र होत चालल्याचे चित्र दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 49391 वर पोहचला असून त्यातील 14183 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर आतापर्यंत 1694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 33514 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक आहे.