Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 27, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

मलाला यूसुफजईला गोळ्या घालणारा दहशतवादी एहसानुल्ला एहसान पाकिस्तानच्या तुरुंगातून पळाला; 6 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Feb 06, 2020 11:24 PM IST
A+
A-
06 Feb, 23:24 (IST)

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) प्रवक्ता एहसानुल्ला एहसान ज्याने मलाला यूसुफजईला गोळ्या घातल्या होत्या, तसेच पेशावर लष्कराच्या शाळेत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी जो जबाबदार होता, तो पाकिस्तानच्या लष्कराच्या तुरूंगातून पळाला.

06 Feb, 22:49 (IST)

कर्नाटक विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या, ऋषिकेश देवडीकरला महाराष्ट्र एटीएसने ट्रान्झिट रिमांडवर राज्यात आणले. आज त्याला नालासोपारा शस्त्र प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात हजर केले होते. कोर्टाने त्याला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

06 Feb, 22:03 (IST)

जम्मू-काश्मीरः नॅशनल कॉन्फरन्स लीडर ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्यावर पब्लिक सेफ्टी कायदा (पीएसए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

06 Feb, 21:19 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवलीमधील गुलाबी रस्त्याची पाहणी केली, त्याची कारणे समजून घेतली. जे घातक कारखाने आहेत त्यांच्यासंदर्भात तीन टप्प्यांत कार्यवाही करण्याचे ठरवले आहे. तसेच केमिकल इंडस्ट्रीला नागरी वस्तीपासून दूर  हलवण्यासंदर्भात 15 दिवसांत सर्व्हेक्षण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

06 Feb, 20:41 (IST)

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावरील केंद्र सरकारच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असून या प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.

06 Feb, 19:41 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवली शहरात तेथील महापौर आणि अन्य पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. त्यांनी येथील प्रदूषणाबाबत मोठी घोषणा केली आहे. डोंबिवलीतील प्रदूषण पाहता येथील कारखान्यांची वर्गवारी करून तीन टप्प्यांत कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच येथील काही वस्त्या शहरापासून दूर नेणार असून येथील कच-याची योग्य रित्या विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कल्याण-डोंबिवलीला स्वच्छ शहर बनविण्यासाठी 100 कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

06 Feb, 19:12 (IST)

राज्यसभेत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनी तसेच अन्य विरोधकांनी सभात्याग केला. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात मोदी सरकार काळातील विकासाची माहिती देत असताना काँग्रेस पक्षावरही जोरदार टीका केली.

06 Feb, 18:48 (IST)

भिवंडीतील रुंगठा डाईंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. Tv9 मराठी ने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीचे लोळ खूप दूरवर पसरल्याचे सांगितले जात आहे. 

06 Feb, 18:35 (IST)

देशात निराश होण्याचे काही कारण नाही. अर्थव्यवस्थेच्या मूलभूत पॅरामीटर्सपैकी आजही देशाची अर्थव्यवस्था बळकट, मजबूत असून पुढे जाण्याचे सामर्थ्य तिच्यात आहेः पंतप्रधान नरेंद्र मोदी

06 Feb, 17:46 (IST)

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीर चा झपाट्याने विकास होत आहे असे नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले. तसेच 5 ऑगस्ट 2019 हा दिवस दहशतवाद पसरवणा-यांसाठी काळा दिवस होता असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Load More

सिल्लोड येथील जळीतकांडातील महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला आगीत 95   टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला 10 फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोषने पीडित महिलेस मारहाण करून रॉकेल ओतून पेटवले आणि घराची कडी लावून पळून गेला होता. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवून पीडितेला घाटी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी उपचाराच्य दरम्यान तिचा मृत्यू झाला.

राज्यातील हवामान पाहायला गेल्यास नागपुरात अवकाळी पावसाची रिपरिप सुरु असल्याने पुन्हा हवेतील गारठा वाढला आहे, सोबतच विदर्भाच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे कापूस, हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्याचं समजतंय.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

आंतराराष्ट्रीय स्तरावर कोरोना व्हायरसचे सावट अद्याप कायम आहे, चीन मध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 560  जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फिलिपाइन्स मध्ये सुद्धा एका व्यक्तीचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सुद्धा केरळ मध्ये या व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहेत मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


Show Full Article Share Now