सध्या देशात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) थैमान पाहायला मिळत आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. दरम्यान देशातील 60% कोरोना बाधित केवळ 5 राज्यांमध्ये आहेत. तर मागील 24 तासांत भर पडलेल्या 89,706 नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) राज्य अव्वल स्थानी आहेत. या नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील 20,000 हून अधिक रुग्ण तर आंध्रप्रदेशातील 10,000 हून अधिक रुग्णांची भर पडली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) देण्यात आली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हापासूनच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्र प्रथमस्थानी आहे. त्या पाठोपाठ कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. त्यामुळे कोविड-19 चा रिकव्हरी रेट सुधारत असून मृत्यूदरात घट होत आहे. (कोरोना व्हायरस Sputnik V Vaccine परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रशियाने मागितली भारताकडे मदत)
ANI Tweet:
60% of the total cases are recorded only in 5 states. Of the total 89,706 new cases, which have been reported in the last 24 hours, Maharashtra has alone contributed more than 20,000 and Andhra Pradesh has contributed more than 10,000: Ministry of Health pic.twitter.com/0Ab5xilXf9
— ANI (@ANI) September 9, 2020
आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 43 लाखांच्या पार केली आहे. 43,70,129 कोरोना बाधित रुग्णांपैकी 33,98,845 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 8,97,394 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना संसर्गामुळे 73,890 जणांचा मृत्यू झाला आहे.