Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

महाराष्ट्र: सरकारी बस वाहतूकीपाठोपाठ खासगी बस वाहतुकीला देखील 100% क्षमतेने चालविण्याची परवानगी ; 6 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Bhakti Aghav | Nov 06, 2020 11:55 PM IST
A+
A-
06 Nov, 23:54 (IST)

सरकारी बस वाहतूकीपाठोपाठ खासगी बस वाहतुकीला देखील 100% प्रवासी क्षमतेने चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे नियम घातले आहेत. 

 

06 Nov, 23:21 (IST)

अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण याच्या विरोधात IPC 294 कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याच्या किना-यावर न्यूड अवस्थेतील फोटो त्याने सोशल मिडियाला पोस्ट केले होते.

06 Nov, 22:51 (IST)

हरियाणा येथे फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

06 Nov, 22:42 (IST)

दिल्लीतील सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयात अद्याप COVID19 च्या रुग्णांना  मोफत उपचार उपलब्ध  आहे.

06 Nov, 22:23 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 7187 रुग्ण आढळले असून तर 64 जणांचा बळी गेला आहे.

06 Nov, 22:17 (IST)

जम्मू-कश्मीर येथे एका स्थानिक दहशतवाद्याचे आत्मसमर्पण तर 2 जणांचा खात्मा करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

06 Nov, 21:46 (IST)

मुंबईत आज दिवसभरात मुंबईत आज दिवसभरात 792 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,62,476 वर पोहोचली असून मृतांची संख्या 10,396 वर पोहोचली आहे. सद्य घडीला मुंबईत 15,962 रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

06 Nov, 21:18 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 5027 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,10,314 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 44,965 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

06 Nov, 21:10 (IST)

हरयाणा मध्ये 2267 नव्या रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,78,413 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 1880 वर पोहोचली आहे.

06 Nov, 20:31 (IST)

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 68 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 83 नवे रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 53,489 वर पोहोचली असून एकूण 51,587 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Load More

देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु, असं असलं तरी, दिवाळी तसेच हिवाळ्याच्या काळावधीत कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारकडून दिवाळीच्या सणासाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिवाळी फटाक्याच्या आतीषबाजीमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी राजस्थान, ओदिशा, सिक्कीम सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतीषबाजीवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून आरोग्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. राजेश टोपे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सरकार कोणता निर्णय घेणार याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. याशिवाय यावर्षी दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीवर मुंबई महापालिकेने निर्बंध घातले आहे. त्यामुळे मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना फटाके फोडता येणार नाहीत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी तुळजाभवानी मंदिर परिसरात गुरुवारपासून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र, रात्री प्रशासनाकडून आंदोलन स्थळावरील तंबू काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आध्यात्मिक आघाडी आणखी आक्रमक भूमिका घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तुळजाभवानी मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.


Show Full Article Share Now