Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 28, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

हिमाचल प्रदेश: कुल्लू जिल्ह्यात 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह गोठलेल्या अवस्थेत आढळला; 6 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Feb 06, 2021 11:35 PM IST
A+
A-
06 Feb, 23:35 (IST)

हिमाचल प्रदेश: कुल्लू जिल्ह्यात 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह गोठलेल्या अवस्थेत आढळला आहे. 3 फेब्रुवारी रोजी तो घरातून बाहेर पडला होता, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी  शोध घेतला असता, 5 फेब्रुवारीला त्याचा मृतदेह गोठलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनानंतर तो कुटुंबात परत देण्यात येईल.

06 Feb, 22:47 (IST)

हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे रस्त्यांवरुन चालताना घसरणे, त्याचबरोबर अनेक अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.

06 Feb, 22:37 (IST)

बंगालमध्ये आज दिवसभरात एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासूनची ही आतापर्यंतची सर्वात कमी संख्या आहे.

06 Feb, 21:58 (IST)

मुंबईत आज दिवसभरात 299 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 2,93,417 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

06 Feb, 21:53 (IST)

हिमाचल प्रदेश मध्ये मागील 24 तासांत 87 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57,851 वर पोहोचली आहे.

06 Feb, 20:42 (IST)

छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेस कमिटीने ठराव मंजूर करून राहुल गांधींना पुन्हा पक्षप्रमुख बनवण्याची मागणी केली.

06 Feb, 20:32 (IST)

कर्नाटकमध्ये आज 531 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 434 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

06 Feb, 19:56 (IST)

राज्यात आज 2,768 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,739 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

06 Feb, 19:33 (IST)

दिल्लीत आतापर्यंत 1 लाखहून अधिक जणांना कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी बहुतेक लोक हेल्थकेअर कर्मचारी आहेत.

 

06 Feb, 19:03 (IST)

कर्नाटक: मंगळुरू एअर कस्टमने एका व्यक्तीकडून 664 ग्रॅम सोन्याची पावडर हस्तगत केली.

 

Load More

कृषी कायद्यावरुन गेले 70 दिवस सुरु असलेलं शेतकरी आंदोलन आता चांगलंच पेटलं आहे. आज आंदोलक शेतकऱ्यांनी चक्का जाम ची हाक दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वॉटर कॅनन्स तयार ठेवण्यात आले आहेत. देशभर चालणारं चक्का जाम आंदोलन आज 12 ते 3 या वेळेत होणार आहे. मात्र यातून उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड ही राज्यं वगळण्यात आली आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा या आंदोलनाला पाठिंबा आहे.

मुंबईतील मानखुर्द येथील गोडाऊनला काल लागलेली आग अद्याप धुमसतीच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने चिंता अधिक वाढत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

 

नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या नोटीसी, समन्स यांना मनसेकडून कोणतीही उत्तरे देण्यात आली नाहीत. अखेर कोर्टाने वॉरंट जारी करत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज सकाळी 10.30 वाजता सीबीडी येथील कोर्टात दाखल होणार आहेत.


Show Full Article Share Now