5G internet Launched: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेस शुभारंभ; पहिल्या टप्प्यात मुंबई, पुण्यासह देशातील 13 शहरांचा समावेश
5G internet | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशात पुन्हा एकदा इंटरनेट सेवा (5G internet Launched) आता अधिक वेगनान होत आहे. इंटरनेट प्रणाली अधिक वेगवान करण्यासाठी आवश्यक अशा 5G इंटरनेट (5G internet) सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर 6 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे शनिवारी (1 ऑक्टोबर) उद्घाटन केले. ज्यामुळे भारतातील पहिल्या टप्प्यातील 13 शहरांना 5G इंटरनेट सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया - या तीन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सनी पंतप्रधान मोदींना इंटरनेटच्या पुढील पिढीचा वापर करून दाखवला. रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी एआय-चालित चष्मा ( AI-Powered Glasses) घातलेल्या पंतप्रधान मोदींना प्रात्यक्षीक दाखवले. पंतप्रधानांना इंटरनेटच्या नवीन पिढीचा वेगवान वेग दाखवण्यात आला ज्यामुळे जगात क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा, 5G Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार 5G सेवांचे उद्घाटन; देशातील दळणवळण क्रांतीच्या नव्या पर्वाची होणार सुरुवात)

5G इंटरनेट सेवा मिळणारी ती 13 शहरं कोणती?

5G इंटरनेट रोल-आउटच्या पहिल्या टप्प्यात 13 शहरांना नवीन सेवा मिळणार आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, इंटरनेटच्या एकूण रोलआउटला काही महिने लागतील, असे सांगितले जात आहे. 5G इंटरनेटचे भाडे 4G नेटवर्कशी तुलना करता थोड्याफार फरकाने सारखेच असण्याची शक्यता आहे.

5G स्पेक्ट्रम लिलावासाठी रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी समूह हे चार प्रमुख बोलीदार होते. त्यांनी स्पेक्ट्रमसाठी 1.50 लाख कोटी रुपयांची बोली लावली होती. 5G इंटरनेटचा अवलंब करणारा भारत हा सर्वात वेगवान देश असेल, असा दावा रिलायन्स जिओने केला आहे. ते 2023 पर्यंत देशभरात 5G कव्हरेज वाढवण्याचा दावा करतात. एअरटेलचा 2024 पर्यंत संपूर्ण कव्हरेज प्रदान करण्याचा मानस आहे. 5G इंटरनेट 4G इंटरनेटपेक्षा 10 पट वेगवान असेल असा दावा केला जाता आहे.