Encounter In Chhattisgarh: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Encounter) सुरू आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या भीषण चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, अबुझमदच्या जंगलात चकमक सुरू आहे. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले आहे.
चकमकीनंतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून अनेक शस्त्रे आणि स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. कांकेर डीआरजी, नारायणपूर डीआरजी, बीएसएफ आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने मोठी कारवाई केली आहे. (हेही वाचा - Sopore Encounter: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक; दहशतवादी ठार, शोध मोहिम सुरू)
छत्तीसगडमध्ये झालेल्या भीषण चकमकीत दोन सुरक्षा जवान जखमी -
#WATCH | Raipur, Chhattisgarh: 2 jawans who got injured in the encounter with Naxalites in the jungle of Abujhmadh at Kanker Narayanpur Border, airlifted and brought to Raipur hospital
So far, the bodies of 5 Naxalites have been recovered. A large quantity of weapons have also… pic.twitter.com/FAs1Z7yv3s
— ANI (@ANI) November 16, 2024
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ज्या भागात चकमक होत आहे तो भाग प्रभावित आहे. यामुळेच सैनिकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. सुरक्षा दलांनी नुकतीच अबुझमदच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, त्यानंतर आज मोठी कारवाई केली जात आहे. याशिवाय 4 ऑक्टोबर रोजी याच जंगलात नक्षलवाद्यांची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये जवळपास 31 नक्षलवादी मारले गेले होते.