अंमलबजावणी संचालनालय गोवा यांच्याकडून भारतीय चलन 44.37 लाख आणि विदेशी चलन 9.55 लाख जप्त; 5 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Mar 06, 2021 12:03 AM IST
देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमी झाली असली तरी ती संपलेली नाही. देशातील अनेक राज्यांमधून कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही स्थिती आणकी वाढू नये अथवा बिकट होऊ नये यासाठी राज्य सरकारं आणि केंद्र सरकार प्रयत्नशिल आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरण उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष प्रामुख्याने सहभागी आहेत. अत्यंत वेगवेगळ्या अशा विचारांचे असलेले हे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मतमतांतरे असणे हे सहाजिक आहे. त्यावरुन अनेकदा या तिन्ही पक्षांमध्ये संघर्षही होताना दिसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बाबरी मशीद पाडकामावरुन व्यक्त केलेल्या विधानावरुन असाच संघर्ष निर्माण होतो की काय अशी चर्चा होती. मात्र, यावर अपवाद वगळता बऱ्याच नेत्यांनी मौन बाळगले आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसने व्यक्त केलेल्या मतावरुन सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याबाबत विधिमंडळात प्रस्ताव आला आणि जनभावना जर त्या प्रस्तावाच्या बाजूने असेल तर काँग्रेसही या प्रस्तावाला पाठिंबा देईल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात महिला अत्याचार प्रकरणांवरुन विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला आहे. यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसऱ्या बाजूला जळगावमधील एका महिला वसतीगृहात महिलांना कपडे काडून डान्स करायला लावल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने सहा महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती.