Coronavirus Cases in India: भारतात कोरोनाचा हाहाकार! 16,922 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4,73,105 वर
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारत आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत करोना बाधितांच्या सर्वाधिक वाढ झाली आहे. मागील 24 तासांत देशात 16,922 नवे रुग्ण आढळले असून देशात 418 रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार भारतात (India) कोरोना बाधितांची (Coronavirus Positive) एकूण संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचली असून एकूण 14,894 वर पोहोचली आहे. त्यासोबत एक दिलासादायक बातमी म्हणजे काल (24 जून) दिवसभरात 13,012 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य घडीला देशात एकूण 1,86,514 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतात दिवसागणिक कोरोना संक्रमितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता देशातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तरीही ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि कोविड योद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर नागरिकही सोशल डिस्ंटसिंगचे पालन करत या लढाईत सरकारसोबत असल्याचे दिसत आहे. Lockdown: पश्चिम बंगाल सरकारने लॉक डाऊन 31 जुलै पर्यंत वाढवला; राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ममता बॅनर्जी सरकारचा मोठा निर्णय

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात कोविड-19 रुग्णांची एकूण रुग्ण संख्या आता 1,42,900 अशी झाली आहे. राज्यात आता पर्यंत 6739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये तब्बल 4161 एवढ्या विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत.