किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विरुद्ध विजयानंतर चेन्नईच्या संघाकडून शेन वॉटसनचे कौतूक; 4 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Oct 04, 2020 11:49 PM IST
देशात कोरोना व्हायरसचे संकट अद्याप घोंगावत आहे. टेस्ट, ट्रेस आणि ट्रिट या त्रिसुत्रीच्या आधारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. जानेवारी मध्ये केवळ एक टेस्ट करण्याची सोय उपलब्ध असलेल्या भारतात ऑक्टोबर महिन्यात तब्बल 7.7 कोटीहून अधिक टेस्ट करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. सातत्याने वाढत असलेल्या चाचण्यांची क्षमता हे कोविड-19 संसर्गावर आळा घालण्याचे उत्तम साधन आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
कोविड-19 चे संकट कायम असले तरी देशात अनलॉकींगला सुरुवात झाली आहे. या महिन्यापासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. अनलॉक 5 चे नियम स्पष्ट झाले असले तरी लोकल कधी सुरु होणार याची मुंबईकरांना प्रतिक्षा आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई लोकल सुरु करण्याचा मानस पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला होता. मात्र मुंबई लोकल सुरु करण्याबाबत अद्याप कोणतीही मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरु होण्याबाबत अस्पष्टता दिसू लागली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशात हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण धुमसत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. नटीच्या घराची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज बेटीच्या बलात्कार आणि हत्येवर शांत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असे आदेश दिले आहेत.