महाराष्ट्रात 145 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची संख्या 635 वर गेली असून एकून आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 4 मुंबई, 1 ठाणे आणि 1 अमरावतीतील रुग्णाचा समावेश आहे. महाराष्ट्रात 52 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज देशात कोरोना बाधितांची संख्या 3,113 वर गेल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना बाधित 145 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 635  झाली. आतापर्यंत 52 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. 

COVID-19 विरुद्ध लढण्यासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवरुन सकारात्मक चर्चा झाली. या आजाराविरुद्ध भारत आणि ब्राझील एकत्र पुढे काय रणनीती आखण्यात येईल यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

 पंजाब येथे कोरोना व्हायरसचे 8 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळल्याने आकडा 65 वर पोहचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मध्य प्रदेशात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या 6 रुग्णांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 3072 वर पोहचला तर 75 जणांचा मृत्यू  झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus: मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसचे 52 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

धारावी येथे आणखी 2 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 5 वर पोहचला आहे.

Load More

कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाचा वेग वाढत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यास्थितीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. मात्र अजूनही या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनला लोकं गांभीर्याने घेताना दिसत नाहीयेत. मुंबई वारंवार सूचनेनांतरही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. आजही भायखळा येथील 18भाजी मार्केट मध्ये अशीच गर्दी दिसून आली, यापूर्वी गुरुवरील मुंबई पोलिसांनी अशाच न ऐकणाऱ्या 1,526 जणांना अटक केली होती.

कोरोनामुळे लागू केलेल्या या लॉक डाऊनचा आजचा 11 वा दिवस आहे. त्यामुळे आता काही ठिकाणी अन्न धान्याचा तुटवडा झाल्याचे पाहायला मिळतेय. अशा वेळी  मुंबई व उपनगरातील गरजू आणि गरीबांच्या जेवणाची व्यवस्था विधान परिषद नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी ते कांदिवली या भागातील किचनच्या माध्यमातून 8000 गरजूना अन्न पुरवले जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबई शहर जिल्ह्यातील जवळपास 29 हजार गरीब व्यक्तींना दोनवेळच्या जेवणाचे वाटप मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्यातर्फे संयुक्तरित्या करण्यात येईल असे मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. कोरोना संदर्भात चालू असलेल्या घटनांविषयी महाराष्ट्रातील व देशातील जनतेला उद्देशून पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसे राज्य सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे. राज यांच्या निवासस्थानी म्हणजेच कृष्णकुंज वर 11 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.