Earthquake (Photo Credits: ANI)

Delhi Earthquake: दिल्लीकरांची बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 ची सकाळ भूकंपाच्या झटक्याने झाली आहे. आज सकाळी दिल्ली, NCR,उत्तर प्रदेश या भागामध्ये भूकंपाचे झटके जाणवले. दिल्लीमधील भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) कांडला येथील आहे. तर तजिकीस्तान या उत्तरप्रदेशातील भागामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारताला काही सेकंद हादवणार्‍या या भूकंपाचे धक्के सौम्य होते. सुमारे 4 ते 4.6 मॅग्निड्युडचे धक्के असल्याने जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

United States Geological Survey ने दिलेल्या माहितीनुसार तजिकिस्तानमध्ये सकाळी 7.5

मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप सुमारे 4.6 magnitude चा होता. तर उत्तरप्रदेशातील भूकंप 4.0-magnitude चा होता. भूकंपाची बातमी समजताच अनेक दिल्लीकरांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. सध्या ट्विटरवरही काही गंमतीशीर ट्विट्स ट्रेंड होत आहेत.