मुंबईतील (Mumbai) कफ परेड (Cuffe Parade) भागात रविवारी दुपारी पावणे तीन वाजता एका चाळीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि कफ परेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भिंत कोसळण्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कफ परेडमधील मियां चाळ, गझाली दर्ग्याजवळ चाळीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ( Nagpur Blast: नागपूरमध्ये अमोनिया गॅस गळतीमुळे बर्फ कारखान्यात सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी (See Pics))
मुंबईच्या कफ परेड परिसरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. चाळीची भिंत 38 वर्षीय मोहम्मद अकबनयर यांच्या अंगावर कोसळली. दुर्घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान आणि कफ परेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या मोहम्मद यांना तातडीने आयएनएस अश्विनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत घोषित केलं.